एक्स्प्लोर
विवाहित अभिनेत्रीवर गँगरेप, कॅमेरामनला बेड्या, गायक फरार

मुंबई : मीरा रोडमध्ये राहणाऱ्या एका भोजपुरी अभिनेत्रीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गायक आणि कॅमेरामने आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित अभिनेत्रीने केला आहे. शीतपेयातून गुंगीचं औषध घेऊन आपल्यावर गँगरेप केल्याची तक्रार अभिनेत्रीने केली आहे. 31 वर्षीय कॅमेरामन अभय तिवारीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून गायक आलम मात्र फरार असल्याची माहिती आहे. 28 वर्षीय पीडिता मीरा रोडमध्ये पती आणि दोन मुलांसह राहते. तिने काही भोजपुरी अल्बममध्ये काम केलं आहे. वर्षभरापूर्वी आलम नावाच्या गायकाशी तिची ओळख झाली. '17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता आलमने आपल्याला जोगेश्वरीतील ऑफिसमध्ये बोलावलं. तिथे नव्या प्रोजेक्टवर काही वेळ बोलणी झाल्यानंतर मला शीतपेय दिलं. त्यानंतर मला चक्कर आली आणि दोघांनी आळीपाळीने आपल्यावर रेप केला.' अशी तक्रार पीडितेने दिल्याचं ओशिवरा पोलिसांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र
ठाणे























