Bhiwandi robbery : भिवंडी (Bhiwandi ) शहरात माजी नगराध्यक्षांचा घरावर चोरांट्यांनी दरोडा टाकलाय.  ताडाळी या गावात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास शिरलेल्या तिघा दरोडेखोरांनी माजी नगराध्यक्षा असलेल्या महिलेस धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 21 लाखांचा ऐवज लंपास केलाय. त्यानंतर चोरटे ऐवज लूटून पसार झाले आहेत. या दरोड्याने भिवंडी परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


लोखंडी कटावणी उगारुन  मारण्याची धमकी


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंबा सोबत राहतात. सोमवारी मध्यरात्री एक ते चार वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून दरोडेखोर आत शिरले. यामध्ये 20 ते 35 वयोगटातील तिघांचा समावेश होता. या तिघा चोरट्यांनी साधना चौधरी झोपलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश करून त्यांच्यावर लोखंडी कटावणी उगारुन  मारण्याची धमकी दिली. 


त्यानंतर बेडरुम मधील लाकडी कपाटाचे लॉकर मधील 50 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 95 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून साधना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिस ठाण्यात जबरी दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बंगल्याच्या परिसरात येताना व जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.


एकूण 21 लाखांचा ऐवज लंपास 


दरोडेखोरांनी माजी नगराध्यक्षांच्या बेडरुम मधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडले. त्यानंतर 50 तोळे वजनाचे  सोन्याचे दागिने व 95 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केलाय. त्यामुळे माजी नगराध्यक्षांच्या घरातून एकूण 21 लाखांचा ऐवज लूटण्यात आलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Drugs : पुणे शहर बनतंय ड्रग्स कॅपिटल; 1100 कोटींचं मेफेड्राॅन जप्त; तरुणांना 'किक' बसवणारं मेफेड्रॉन नेमकं आहे तरी काय?