एक्स्प्लोर
Advertisement
कोरोना व्हायरसपासून बचाव करणारी गादी, भिवंडीत फसव्या जाहिरातदाराविरोधात गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसवर उपचार करणारे कोणतेही औषध अजून बाजारात उपलब्ध झाले नसताना अशा फसव्या जाहिराती पासून नागरीकांनी सावध राहावे असे आवाहन पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केले आहे .
भिवंडी : जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना महाराष्ट्रात आलेल्या संवेदनशील परिस्थिती विरोधात प्रशासन दोन हात करून लढत आहे. अशातच खोट्या जाहिरात प्रसार वाढतो आहे. भिवंडीत याचाच प्रत्यय आला. अरिहंत नामक गादीवर झोपल्यास कोरोना विषाणूची लागण होत नाही अशी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. याप्रकरणी समाजातील नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब डावखरे यांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील कशेळी आणि वळ या ग्रामपंचायत क्षेत्रातील अरीहंत मेट्रेस या विक्रेत्याने ‘अँटी कोरोना व्हायरस मेट्रेस’ ही 15 हजार रुपयांची गादी विक्रीस आणली. तसेच त्यावर झोपल्यास कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही अशी फसवी जाहिरात मुंबई समाचार या गुजराती दैनिकात 13 मार्चच्या अंकात प्रकाशित करुन जनतेची फसवणूक करण्यात आली.
या बाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब डावखरे यांची तक्रार घेऊन अरिहंत मेट्रेस चे मालक अमर पारेख यांच्या विरोधात भादवी कलम 505 [ 2 ( ब ) ] सह आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 चे कलम 52 व औषधी द्रव्य व तिलस्मी उपचार [ आक्षेपार्ह जाहिरात ] अधिनियम 1954 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कोरोना व्हायरसवर उपचार करणारे कोणतेही औषध अजून बाजारात उपलब्ध झाले नसताना अशा फसव्या जाहिराती पासून नागरीकांनी सावध राहावे असे आवाहन पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केले आहे.
#Corona positive patients in train | क्वॉरंटाईन केलेल्या चौघांचा चक्क रेल्वेतून प्रवास, हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement