Bhiwandi Crime News : गर्लफ्रेंडच्या वादातून एका हॉटेल चालकाचे धारदार हत्याराने गुप्तांग छाटत मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील फातमानगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपी मित्राला बेड्या ठोकल्या आहे. अस्लम अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शमीम उर्फ सलमान खान (21 वर्ष) असे निर्घृण हत्या झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक शमीम उर्फ सलमान हॉटेल व्यवसायिक होता. तर आरोपी अस्लम अन्सारी हा त्याच परिसरात राहत असून दोघे जिवलग मित्र होते. आरोपीच्या गर्लफ्रेंड सोबत शमीमचे अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून आरोपी आणि मयत दोघांमध्ये वाद झाले होते. यातूनच आरोपी मित्राने त्याला जर तुला गुप्तांगच नाही राहिले तर तू काय करणार असे बोलून गुप्तांग कापण्याची धमकी दिली. त्यातच काल मध्यरात्रीही त्याच गर्लफ्रेंडवरुन वाद झाला.
यानंतर मध्यरात्री एक ते दीड वाजल्याच्या सुमारास हॉटेल बंद केल्यानंतर मृतक शमीम उर्फ सलमान याच्यावर आरोपी अस्लमने धारदार हत्याराने डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग छाटून त्याच्यात तोंडात कोंबले. त्याच्या शरीरावर तब्बल 9 ठिकाणी वार करून त्याची निर्घृण हत्या करून आरोपी फरार झाला
सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनवरून आरोपीला पकडण्यासाठी क्राईम ब्रँच तसेच शांतीनगर पोलीस यांच्या पथकाने जंग जंग पछाडले. क्राईम ब्रांचच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कामतघरच्या परिसरात लपून बसला आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात रवाना करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला 12 तासाच्या आतच शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
ही बातमी देखील वाचा