मुंबई: बहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या रोख रक्कम आणि दागिन्यावर सख्या भावानेच डला मारल्याची घटना मिरा रोडमध्ये घडली आहे. आपल्या सख्या बहिणीच्या घरी भावाने 26 लाखाची चोरी केली होती. फरमान जावेद खान असं या आरोपीचं नाव असून त्याला पकडण्यात पोलीसांना यश आलं आहे. त्याला गुजरातच्या वलसाड येथून अटक करण्यात आली आहे.  


मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने 1 ने फरमान जावेद खानला अटक केली आहे. फरमानने आपल्याच सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी करून बहीण भावाच्या नात्यालाच काळिमा फासलं आहे. फिर्यादी तरुन्नुन जावेद खान ही मिरा रोडला राहते. तिने आपल्या छोट्या बहिणीच्या लग्नासाठी घरात 25 लाखाची रोख रक्कम आणि 1.20 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 40 हजार किंमतीचे कानातील झुमके असे किंमती सामान घरी ठेवले होते. 4 नोव्हेंबर रोजी फरमानची बहिण आणि कुटुंबातील सदस्य लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. मात्र त्या लग्नाला फरमान आजारी असल्याचं कारण सांगून गेला नाही. 


राञी 9 ते 12 च्या दरम्यान तरुन्नुम खान यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने धरुन 26 लाख 60 हजाराची चोरी झाली होती. पोलिसांच्या पथकाला घटनास्थळाची पाहणी करुन आणि तांत्रिक गोष्टीच्या आधारावरुन फरहानवर संशय आला. मात्र पेशाने रिक्षाचालक असणारा फरहान या घटनेनंतर आपली पत्नी, मुलगा आणि मेहुणीला घेवून फरार झाल्याचं समजलं. 


पोलिसांच्या तपास यंत्रणेला आरोपी गुजरातला पळून गेल्याच कळल्यावर वेगवेगळ्या टीम तयार करुन, गुन्हे शाखा 1 च्या युनिटनं फरमानला गुजरातच्या वलसाड येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांना 25,24,500 रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले सहा मोबाईल फोन जप्त केले. 


इतर महत्त्वाची बातमी :