मुंबई : 'भीम आर्मी'चे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भीम आर्मीच्या मुंबईतल्या नेत्यांनी मुंबई पोलिसांवर भेदभाव करुन आवाज दडपल्याचा आरोप केला आहे.
आमच्या संघटनेने शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमास विरोध केल्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक आम्हाला परवानगी देत नसल्याचा दावा भीम आर्मीने केला आहे. भीम आर्मीने वरळीतल्या जांबोरी मैदानात तसंच दादरच्या चैत्यभूमी परिसरात कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी मागितली होती.
वरळी पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं कारण देऊन परवानगी नाकारली. तर दादर पोलिसांनी सुट्टीचा दिवस असल्याने अनुयायांची गर्दी होत असल्याने तिथंही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होत असल्याचं सांगून परवानगी देण्यास नकार दिला आहे.
'भीम आर्मी' प्रमुखांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2018 02:47 PM (IST)
आमच्या संघटनेने शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमास विरोध केल्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक आम्हाला परवानगी देत नसल्याचा दावा भीम आर्मीने केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -