मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 30,000 बेस्ट कर्मचारी जाणार संपावर आहेत. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं 30 हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचा दावा केला आहे.


आपल्या मागण्यांसाठी बेस्टच्या वाहतूक आणि वीज पुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे मुंबईतीळ वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी  कामगार संघटनांनी आज संपाच्या निर्णयाबाबत मतदानाचा निर्णय घेतला होता. यामध्ये संप करण्याच्या बाजूने भरघोस मतदान झाल्याने हा संप 7  जानेवारीच्या मध्यरात्रीपासून केला जाणार आहे.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या 

- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे

- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी

- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे

- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस

-कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा

-अनुकंपा भरती सुरू करावी

अशा मागण्या बेस्ट वर्कर्स युनियनने केलेल्या आहेत.