एक्स्प्लोर

विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी सिद्धिविनायक मंदिरात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दोघेही एकत्र पाहायला मिळाले. दोघांनीही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

मुंबई: इंधन दरवाढीविरोधात देशभरात विरोधकांनी एकत्र येत भारत बंदची हाक दिली आहे. शिवसेनेनेही पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन ‘सामना’तून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दोघेही एकत्र पाहायला मिळाले. दोघांनीही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सिद्धिविनायकाच्या चरणी दोघांनी एकत्र माथा टेकला. भारतीय पोस्ट विभागातर्फे  सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेऊन, आज त्यांच्या हस्ते या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले. विरोधक रस्त्यावर, सत्ताधारी सिद्धिविनायक मंदिरात यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल उपस्थित होते. भारतीय पोस्ट विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सामनातून विरोध, पण बंदमध्ये सहभाग नाही दरम्यान, आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र दिसले असले, तरी सामनातून सरकारवर इंधन दरवाढीवरुन टीकास्त्र सोडण्यात आलं. एकीकडे सर्व विरोधक भारत बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र सत्तेत राहून कायम सरकारविरोधात भूमिका घेणारी शिवसेना आज सत्ताधाऱ्यांसोबत आहे. शिवसेनेनं आजच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. पण त्याला यश आलं नाही. कारण शिवसेनेनं बंदमध्ये सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याची माहिती मिळते. दैनिक मिररनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. पण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळं आहे. यापूर्वी अमित शाहांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज्यसभेत उपसभापतीच्या निवडणुकीवेळीही शिवसेनेनं भाजपला साथ दिली आणि आता अमित शाहा आणि मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर बॅकफूटवर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध फक्त सामनाच्या अग्रलेखापुरता आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget