एक्स्प्लोर

Bhandup Fire : ड्रीम मॉलमधील आग 30 तासानंतर आटोक्यात, कुलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन सुरू

भांडुपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत सनराईज रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र या आगीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी दोषी असल्याचे फलक शिवसेनेचे संजय दीना पाटील यांनी लावले आहेत

मुंबई  : भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीला 30 तास उलटून गेले आहेत. आगीवर पूर्णपणे आता नियंत्रण मिळविण्यात आले असून आता कुलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे.आता पर्यंत या अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला आहे. 

भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयात हे रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. गोविंदलाल दास(80) , झवेरचंद निसार(74), राजेंद्र मुणगेकर(66), सुनंदा बाई आबाजी पाटील(58) त्यांचे पती आबाजी पाटील(65), सुधीर लाड(66), मंजुलाबेन बारभाई(86), श्याम भक्तानी(75), महादेवन अय्यर(79), हरीश सचदेव(60) आणि एक अज्ञात पुरुष असे एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या ठिकाणी अग्निशमन दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. शेकडो दुकाने खाक झाली असून मॉल बेचिराख झाला आहे.तीस तास उलटून गेल्यावर आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी सर्व खाक झाले आहे.

भांडुपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत सनराईज रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र या आगीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी दोषी असल्याचे फलक शिवसेनेचे संजय दीना पाटील यांनी लावले आहेत. त्यांनी सदर मॉल आणि रुग्णालय च्या अग्निसुरक्षा उपायाबाबत पालिकेला ऑक्टोंबर महिन्यात लिहिलेले पत्र या फ्लेक्सवर लावले आहे. तर दलालीचा बाबू करतात माणसाची होळी असा मथळा या फ्लेक्सला देण्यात आला आहे. हे फ्लेक्स ड्रीम मॉलच्या गेटसह आजू बाजूच्या परिसरात लावण्यात आले आहेत.

ड्रीम मॉल शापित प्रॉपर्टी, घोटाळ्याचा महाल! 

हा मॉल शापित मॉल असल्याचे देखील बोलले जात आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता.  यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं.  यात भांडुप येथील या ड्रीम मॉलचा समावेश होता.  पालिकेने या मॉलला सुद्धा नोटीस बजावली होती, अशी माहिती आहे.  दरम्यान हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. निर्माण झाल्यापासून तो कधीच सुरू झाला नाही. एचडीआयएल ने तो बांधला आहे. आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे.

Bhandup Fire : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये,  मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट,  दोषींवर तत्काळ कारवाईचे निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget