एक्स्प्लोर

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार: प्रफुल्ल पटेल

नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु", असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

मुंबई: "भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर "खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु", असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. 28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जागेचा पेच सुटणार? 2014 ची लोकसभा निवडणूक लढवून नाना पटोले सत्तेवर आले. पटोलेंनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. मात्र भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाना पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नसल्याची चर्चा होती. दुसरीकडे आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार, त्याला पर्याय नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पोटनिवडणुकीसाठी भंडारा- गोंदियाच्या जागेवर दावा केला होता. त्यामुळे या जागेवर नेमका कोण उमेदवार देणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.  प्रफुल्ल पटेल भावासारखे : नाना पटोले उमेदवार कुणीही असो, एकमेकांना मदत करु, असं म्हणत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीबाबत सावध पवित्रा घेतला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी  प्रफुल्ल पटेल हे आपल्याला भावासारखे आहेत, असं म्हटलं होतं. भंडारा गोंदियातील प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद संपलेला आहे. भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यावर एकमत झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊन ही निवडणूक लढेल. वरिष्ठ येत्या दोन दिवसात निर्णय घेतील. जो निर्णय देतील तो दोघांनाही मान्य असेल.”, अशी भूमिका नाना पटोले यांनी जाहीर केली. संबंधित बातम्या  प्रफुल्ल पटेल भावासारखे, भंडारा-गोंदियात एकमेकांना मदत करु : पटोले   भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक कोण लढवणार?   गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा   मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने वकिलाला फोनवरुन धमकावलं : पटोले   भाजपचे माजी खासदार नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार   माजी खासदार नाना पटोलेंची घरवापसी, काँग्रेसमध्ये प्रवेश   फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले  

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget