एक्स्प्लोर

जादूगार गँगपासून सावधान, पापणी मिटण्यापूर्वीच ऐवज लंपास करतात!

या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन रस्त्यावरुन जात आहे. पण अचानक या व्यक्तीच्या जवळपास काही जण फिरताना दिसतात. हातात दागिन्यांची बॅग घेऊन जाणारा इसम जादूगार गँगचा शिकारी आहे.

मुंबई : मुंबईत तुम्ही जर तुमच्यासोबत काही मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम घेऊन जात असाल तर काळजी घ्या, कारण मुंबईत सध्या जादूगार गँगने धुमाकूळ घातला आहे. काही कळायच्या आतच ही गँग तुमच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करते. ह्या गँगचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबईच्या रेल्वे क्राईम ब्रान्च पोलिसांनी अशाच एका गँगचा पर्दाफाश केला आहे. पण शहरात ही गँग अजूनही सक्रिय आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन रस्त्यावरुन जात आहे. पण अचानक या व्यक्तीच्या जवळपास काही जण फिरताना दिसतात. हातात दागिन्यांची बॅग घेऊन जाणारा इसम जादूगार गँगचा शिकारी आहे. जादूगार गँगमधील दोघांच्या हातात बॅग आहे, तर एकाच्या हातात पिशवी. बॅगवाल्या दोघांनी आपल्या बॅगेच्या सहाय्याने त्या माणसाच्या मागे आडोसा तयार केला. त्याचवेळी रिकाम्या हाती असणाऱ्या तिसऱ्या साथीदाराने त्या माणसाच्या हातातली सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली आणि पिशवी असलेल्या साथीदाराच्या हातात दिली. अवघ्या 5 सेकंदात त्या माणसाच्या हातून 30 तोळे सोन्यांची बॅग लंपास झाली रेल्वे पोलिसांनी सचिन कुंचीकर्वे उर्फ सत्या, निखील पप्पू देवाल उर्फ नवाब, महमद आदम उर्फ बटला, जबीर अली सय्यद या चार आरोपींना अटक केली आहे. या गँगने 3 ऑगस्टला मालाडमध्ये अशाचप्रकारे एका व्यक्तीच्या हातातून 12 लाख रुपयांची रोकड पळवली आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड जस्त केली आहे. मुंबई रेल्वे पोलिसांच्या क्राईम ब्रान्चचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या माहितीनुसार, "जादूगार गँगमध्ये 8 ते 10 सदस्य असतात, जे पापणी मिटण्याआधीच एखाद्याच्या हातातील वस्तू गायब करतात. पोलिसांपासून सावध राहण्यासाठी ते एकमेकांशी बोलताना कोडवर्डचा वापर करतात. यांच्या भाषेत शिकाराचा अर्थ 'धूर'. या गँगचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रुपमध्ये चालतात पण कोणालाही कसलाही संशय येत नाही. चालणाऱ्या सामान्य माणसाला असंच वाटतं की, त्याच्या शेजारी चालणारे लोक त्याच्यासारखेच सामान्य आहेत. पण संधी मिळताच त्याच्या हातात वस्तू घेऊन आपल्या साथीदारांकडे सोपवतात आणि सगळे आपापल्या रस्त्याने चालायला लागतात. या जादूगार गँगने केवळ मुंबईच्या दिंडोशी, एलटी मार्ग, वांद्रे आणि बोरीवलीमध्येच नाही तर जयपूर, बंगळुरु आणि लखनौमध्ये आपलं जाळं पसरवलं आहे. मालाड, बोरीवली आणि एल टी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ह्या गँगचे अनेक सदस्य फरार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Embed widget