ठाणे-दिवादरम्यानची पाचवी, सहावी मार्गिका जून 2019 पर्यंत पूर्ण होणार
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज रेल्वे अधिकाऱ्यांसोबत जाऊन कामाची पाहणी केली.

ठाणे : ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सुरू असलेलं रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम जून 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. खासदारांसह रेल्वे अधिकाऱ्यांनी आज या कामाची पाहणी केली.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मुंब्रा स्थानकाजवळ खाडीत भराव टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र हा भराव खचून डंपर आणि अजस्त्र पायलिंग मशीन खाडीत बुडाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.
या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे यापुढे दगडी चिरेबंदी टाकण्यात येणार असून पुढे काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच कामाचा वेग पाहता पुढील वर्षी जून अखेर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.
Before You Go
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?





















