एक्स्प्लोर

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी

बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याला आयुक्तांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप सुरूच राहणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे. बाकीच्या मागण्यांवर देखील कुठलेही लेखी आश्वासन दिलेले नाही. बैठकीत चर्चा कुठेलाही तोडगा निघाला नाही.

मुंबई :  बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. हा संप मिटण्याची आशा धूसर झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात अपयश आले आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असून उद्या बेस्ट कामगारांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असे, बेस्ट कर्मचारी संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर स्वतः उद्धव ठाकरे अजाॅय मेहता, सुरेन्द्र बागडे आणि बेस्ट कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली होती.ही बैठक तब्बल ७ तास चालली. तरीही या बैठकीत कुठलाही  तोडगा निघाला नाही.
बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याला आयुक्तांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप सुरूच राहणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे. बाकीच्या मागण्यांवर देखील कुठलेही लेखी आश्वासन दिलेले नाही. बैठकीत चर्चा कुठेलाही तोडगा निघाला नाही. आम्हाला पैसे नाहीत असे सांगितले. 7 तासाहून अधिक तास चाललेली बैठक निष्फळ ठरली असल्याचे राव म्हणाले.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र मार्ग निघाला नाही, असेही ते म्हणाले. सोबतच या संदर्भात आम्ही आधीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून मागण्यांवर विचार करून आम्हाला काहीतरी लेखी द्या, अशी मागणी राव यांनी केली.
या बैठकीत आयुक्तांनी बराच वेळ चर्चा केली. मात्र काहीच तोडगा निघाला नाही. हे आंदोलन कामगारांचे आहे. आम्ही कामगारांसमोर काय घेऊन जायचे. कामगारांचे स्पष्ट म्हणणे आहे की, असेही जगणे कठीण आहे. त्रासदायक आहे. त्यामुळे सन्मानजनक तोडगा काढावा अशी कामगारांची भावना आहे, असे राव म्हणाले. उद्या आम्ही कामगारांचा मेळावा घेणार आहोत,  त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असेही राव यांनी सांगितले.
बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी
बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत रुजू होण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करत अ‍ॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस धाडत शुक्रवारी सकाळी यावर तातडीची सुनावणी ठेवली आहे. विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्टच्या कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. या संपात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून बेस्टच्या सुमारे 3700 बसेस विविध आगारात उभ्या आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात एक समिती स्थापन करावी. अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर करण्यात आली. कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर कामावर जायचं नसेल तर बेस्ट वसाहतीतल्या खोल्या खाली करा, असा आदेशही बेस्ट प्रशासनाने दिला आहे. यामुळे भोईवाडा बेस्ट वसाहतीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि बेस्ट प्रशासनात जुंपली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच असल्याने विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे आजही हाल होत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनाप्रणित कामगार सेनेनं माघार घेतली. पण, कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास नकार दिला. कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी आज कामावर रुजू होणार असल्याचं संघटनेने म्हटलं, पण आज 11 हजारांपैकी फक्त 59 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने काल 500 बेस्ट बस रस्त्यावर उतरण्याची घोषणादेखील फोल ठरली आहे. परिणामी शिवसेनेच्या संघटनेतील बेबनाव समोर आला आहे.  संपाबाबत नामुष्की झाल्याची शिवसेनेची कबुली बेस्ट संपाबाबत झालेल्या नामुष्कीची शिवसेनेने कबुली दिली आहे. आदेश देऊनही आमच्या संघटनेतील कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, असं शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितलं. बेस्ट संपातून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेची माघार तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: बेस्ट संपात लक्ष घालणार आहे. उद्या दौऱ्यावरुन आल्यावर बेस्ट संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेणार आहेत. शिवाय कनिष्ठ कामगार श्रेणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहे. कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांना समान श्रेणी, समान वेतन देण्यात येईल, अशी चर्चा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी झाल्याचं त्यांनी सांगितलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या - बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Raj Thackeray Grandson And Amit Thackeray Daughter Name: राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget