एक्स्प्लोर

मातोश्रीवरील बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन

बेस्टसंयुक्त कामगार समितीचे नेते कालपासून बेमुदत उपोषण आंदोलन करत असून तोडगा न काढल्यास कामगारांनी संपाचा इशारा दिला होता.

मुंबई : वेतन करारासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीचं बेमुदत उपोषणाला यश मिळालं आहे. बुधवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन करारासंदर्भातली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांनाही आता सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या वेतनकरारासह विविध मागण्यांसाठी आग्रही असलेल्या बेस्ट संयुक्त कृती समितीने संपाचा इशारा दिला होता. संप पुकारण्याबाबत मतदान घेण्यात आलं होतं. त्यात बेस्टच्या 98 टक्के कामगारांनी संपाला समर्थन दिलं होतं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह बेस्ट समिती अध्यक्ष, बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. तसेचं बेस्ट कर्मचाऱ्यांची ही मागणी आज तत्वत: मान्य करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असंही आश्वासन आमदार अनिल परब यांनी दिलं आहे. बेस्ट कामगार वेतन कराराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर चर्चा झाली. बेस्टसंयुक्त कामगार समितीचे नेते कालपासून बेमुदत उपोषण आंदोलन करत असून तोडगा न काढल्यास कामगारांनी संपाचा इशारा दिला होता. याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की कोण माघार घेतो, कोण ठाम आहे त्याच्याशी आमचं देणेघेणे नाही. आमची भूमीका बेस्टच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांना सातवा आयोगच्या धरतीवर वेतन मिळाला पाहिजे याबाबतची आहे. आम्ही निर्णय घेतला असून ऑक्टोबरमध्ये नव्या पद्धतीने पगार मिळेल. सानुग्रह अनुदान हे पालिकेच्या धरती वर मिळेल. त्यासाठीचा पैसा पालिका देईल असा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget