एक्स्प्लोर

बेस्ट कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड!, सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे हायकोर्टाचे आदेश

औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूनं निकाल देत सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले होते. मात्र बेस्ट प्रशासनानं याला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली होती.

मुंबई :  ऐन दिवाळीच्या तोंडावर बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी मोजक्याच नव्हे तर सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाने बोनस द्यावा असे आदेश दिले. हायकोर्टाच्या या आदेशामुळे हजारो बेस्ट कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे तब्बल ३१ हजार ४६२ कर्मचा-यांना लाभ होणार आहे. यापूर्वी प्रशासनानं केवळ सामंजस्य करारावर सही करणाऱ्या 15 हजार 813 कर्मचाऱ्यांनाच यंदा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. बेस्ट प्रशासनाने याआधी केवळ सामंजस्य करारावर सही करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच यंदा दिवाळीत सानुग्रह अनुदान म्हणजेच (बोनस) देण्याचे जाहीर केले होते. या करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे त्यामुळे नुकसान होणार होते. या प्रकरणी बेस्ट प्रशासनाच्या भूमिकेविरोधात कर्मचारी संघटनेनं औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूनं निकाल देत सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले होते. मात्र बेस्ट प्रशासनानं याला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली होती. यावर शुक्रवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्यावतीने कोर्टाला सांगितले गेले की, बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. तर प्रशासनाच्यावतीने कोर्टाला सांगितले गेले की या पूर्वीसुद्धा 2016 ते 2018 दरम्यान आर्थिक तोट्यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला नव्हता. मात्र हायकोर्टानं कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेत औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला व सरसकट सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे आदेश देत यावर तीन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. मात्र हा बोनस कागदोपत्रीच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, 2017 मध्ये बेस्ट प्रशासनाने सरसकट बोनस जाहीर करून कर्मचाऱ्यांना वाटला होता. मात्र, दिलेला बोनस आर्थिक स्थिती वाईट असल्याचं कारण सांगत 11 हफ्त्यात पैसे कापून बोनसचे पैसे परत घेतले. साल 2018 मध्येही बोनस जाहीर करण्यात आला होता, मात्र आर्थिक परिस्थीतीचं कारण पुढे करत तो कागदावरच राहिला. यंदा मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने बेस्ट प्रशासनाने 9 हजार 100 रूपये बोनस देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, यासंदर्भात बेस्ट समितीची अद्याप बैठक झालेली नसून ती येत्या 29 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे बोनस देण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस हा सध्यातरी कागदावरच अडकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget