एक्स्प्लोर

बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर नियतकालिकाचे प्रकाशन, नवोदित उद्योजकांनी हे आवर्जून वाचावं, पद्मश्री मिलिंद कांबळेंचं आवाहन

बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर संस्थेतर्फे शनिवारी चेंबूर येथे यशस्वी उद्योजकांना गौरविण्यात आले. तसेच बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर नियतकालिकाचे प्रकाशन मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई : बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या संस्थेतर्फे शनिवारी चेंबूर येथे यशस्वी उद्योजकांना गौरविण्यात आले. तसेच बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाचे प्रकाशन मिलिंद कांबळे आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे, बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअरचे सर्वेसर्वा अरुण धनेश्वर, चेतना कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मधुमिता पाटील, चेतना आर. के इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या संचालिका डॉ नंदिता मिश्रा, सिने कलाकार साहिला छड्डा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.     

13 यशस्वी उद्योजकांना सन्मानचिन्ह 

यावेळी 13 यशस्वी उद्योजकांना पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये तन्वी इंजीनियरिंग कॉर्पोरेशनचे सुनील शिंदे, बिझ क्राफ्ट सोल्यूशन्स प्रा. लिचे संतोष कांबळे, सूपर्ब ग्रुपचे सुगात वाघमारे, सर्वेश एक्सप्रेस प्रा. लिचे संजय परब आणि विद्या परब, अन्नपूर्णा पर्सच्या उज्वला कांबळे, इलेक्ट्रोफाइन रिसायकलिंगच्या वैशाली स्वरूप, झिव्हट्रिक्स कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लिचे दिपेश मढकर, क्लेंझो एक्सप्रेस लॉण्ड्रीचे निलेश भोईर व प्राची भोईर, नाईस स्टील इंडियाचे खुशाल लाहोटी, मेटा क्राफ्ट इंडस्ट्रीजचे मिलिंद वायदंडे आणि निलेश वायदंडे, आरएनआर स्टोअरचे यश राठोर, युक्ती मिडिया कन्सल्टन्सीचे प्रमोद सावंत व अर्चना सोंडे आदी उद्योजकांचा या सत्कारमूर्ती मध्ये समावेश होता.    

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया : मिलिंद कांबळे 

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. हेच क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करते असे मत पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. भारताच्या जीडीपीमध्ये देखील मोठे योगदान देते. आजच्या काळात कधी नव्हे ते माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारलेले आहे. मोबाईल हे निव्वळ संवादाचे साधन राहिले नसून तुमचे आधुनिक शस्त्र बनले आहे. कृत्रिम प्रज्ञा वापरुन निमिषार्धात पाहिजे ती माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. सभोवताली रोजगाराच्या उदंड संधी उपलब्ध असताना जर कोणी बेरोजगार असेल तर तो स्वेच्छेने बेरोजगार आहे असे मी मानतो असे कांबळे म्हणाले. यावेळी त्यांनी बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाचे प्रकाशन केल्याबद्दल अरुण धनेश्वर यांना शुभेच्छा दिल्या. 

नवउद्योजकांच्या मनात उद्योग सुरू करताना अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न त्यांना कोणत्याही पुस्तकातून मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र अनुभवाच्या शाळेतून तावून सुलाखून निघालेले उद्योजक या प्रश्नांची उत्तरे जाणतात. त्यांचा अनुभव नवउद्योजकांना दीपस्तंभ ठरावा या हेतूने बिईंग सक्सेसफूल आंत्रेप्रेन्यूअर या नियतकालिकाची निर्मिती केल्याचे अरुण धनेश्वर यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतना महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीप नेमळेकर यांनी केले.

 

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Embed widget