एक्स्प्लोर

बीडीडीची 68% जमीन चाळकऱ्यांना, 32 टक्के विक्री!

मुंबई: गिरणगावातील 195 बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. पुनर्विकास करताना 68 टक्के जमीन ही चाळकऱ्यांच्या घरासाठी असेल. तर केवळ 32 टक्के जमीनची विक्री केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली. पुढील दोन वर्षात मुंबईतील पुनर्विकासाचं एकही काम शिल्लक राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. तसंच येत्या दोन वर्षात सर्व पोलिसांना हक्काची घरं देणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बीडीडी चाळींचा इतिहास, वैशिष्ट्ये पूर्वीच्या सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 'बीडीडीची जमीन सोन्याचा तुकडा' मुख्यमंत्री म्हणाले, "बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. मी विधानभवनात प्रवेश केल्यापासून एक अधिवेशन असं गेलं नाही जिथे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची चर्चा झाली नाही, मात्र काम कधीच झालेलं दिसलं नाही. इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे काम कधीच झालं नाही. या जमिनीचा भाग म्हणजे अनेकांसाठी सोन्याचा तुकडा होता. मात्र अनेक लांडगे एकाच भक्षापाठी जातात तेव्हा कोणालाच काही मिळत नाही अशी कथा या बीडीडी चालीची आहे." हत्ती निघालाय, शेपूट अडकू देणार नाही याशिवाय "आता हत्ती निघालाय, शेपूट अडकू देणार नाही. आम्ही कोणाच्या अजेंड्यासाठी थांबणार नाही. आमचे उद्दीष्ट स्पष्ट आहे, आमचा अजेंडा लोकहीत आहे. पुढच्या दोन वर्षात मुंबईतल्या पुनर्वसनाचं एकही काम शिल्लक ठेवणार नाही", अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पोलिसांना घरं देणार "बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना घर द्यावंच लागेल. त्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनीसुद्धा संघर्ष केला आहे. पुढच्या दोन वर्षात सर्व पोलिसांसाठी मालकी हक्काची घर मिळवून देणार. पंतप्रधान आवास योजनेत पोलिसांच्या घरांच्या प्रकल्पाचा समावेश करून घेतला आहे. माझा शब्द आहे हा पुनर्विकास वेळेत पूर्ण करणारच, फक्त तुमची साथ हवी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली. आता शिव्या द्या, मात्र नंतर आशिर्वादही द्या घराला रंग जरी लावायचा झाला तरी घरातील सामान बाहेर काढावं लागतं. त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागेल. आम्हाला शिव्या दिल्या तरी चालेल पण काम पूर्ण झाल्यावर आशिर्वादही द्या, असा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. संबंधित बातम्या
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं आज भूमीपूजन 
बीडीडी चाळींचा इतिहास, वैशिष्ट्ये

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget