एक्स्प्लोर
हातावर सुसाईड नोट, बारामतीत युवकाची आत्महत्या
19 वर्षीय महेश मगुटने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

बारामती : हातावर सुसाईड नोट लिहून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बारामतीत उघडकीस आली आहे. 19 वर्षीय महेश भानुदास मगुट (कोळी) ने आयुष्य संपवलं. महेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमुळे आत्महत्या करत असल्याचं महेशने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलं होतं. 'माझ्या मरणासाठी जबाबदार बँक कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. आई, आबा, अक्का माफ करा' असं महेशने लिहिलं. बारामती तालुक्यातल्या काटेवाडीमध्ये ही घटना घडली. बारामतीतील पोलिस ठाण्यात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Before You Go
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा





















