Bank Recruitment 2021 : जर तुम्ही बँकेत (Bank Jobs) नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तुमचं पदवी शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी आहे. सारस्वत सहकारी बँक लिमिटेड (Saraswat Cooperative Bank), मुंबई (MMRDA) आणि पुणेच्या शाखांमध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची सूचना (Notification) जारी करण्यात आले आहे. इच्छुकांना 22 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.


या भरती प्रक्रियेमध्ये मुंबई आणि पुणे येथील बँकेच्या शाखांमध्ये 300 कनिष्ठ अधिकारी पदांवर भरती करण्यात येणार आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरतीमध्ये सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, मुंबई (MMRDA) आणि पुणेच्या शाखांमध्ये मार्केटिंग आणि ऑपरेशन्सच्या पदांसाठी करण्यात येणार आहे.


कोण करु शकणार अर्ज?


शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यात प्राप्त विद्यापिठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासाठी 22 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 


वयाची मर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 01 डिसेंबर 2021पर्यंत 30 वर्षापेक्षा अधिक असू नये.


निवड प्रक्रिया
बँक पात्र अर्जदारांना मुलाखत फेरीसाठी बोलावेल. ज्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना कनिष्ठ अधिकारी पदासाठी निवडले जाईल. मुलाखतीची तारीख लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.


असा करा अर्ज
पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठी तुम्हांला saraswatbank.com या संकेतस्थळावर जावं लागेल. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर 2021 पासून सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत चालेल. 


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI