एक्स्प्लोर

31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही

वांद्रे स्थानकापासून कलानगरपर्यंत जाणारा मुंबईतील पहिला स्कायवॉक गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा एफओबी पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला होईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली आहे.

मुंबई : वांद्रे स्थानकापासून कलानगरपर्यंत जाणारा मुंबईतील पहिला स्कायवॉक गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा एफओबी पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला होईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हिजेटिआयकडून पूर्ण होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत ते आपला अंतिम अहवाल सादर करतील. शुक्रवारी यासंदर्भात पालिकेनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली. तसेच या अहवाल म्हटले आहे की, सध्या या पुलाला कोणताही धोका नसला तरी, अंतिम अहवाल येईपर्यंत हा पूल बंदच ठेवावा. वांद्रे स्थानकापासून कलानगरपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना कारावा लागू नये, यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला. मात्र काही कारणास्तव हा स्कायवॉक एमएमआरडीएने बंद केला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून हा स्कायवॉक बंद असल्याने लाखो पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या स्कायवॉकच्या दुरुस्तीप्रकरणी वांद्रे येथील रहिवासी के. पी. पी. नायर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याप्रकरणी एमएमआरडीएसह पालिका प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget