एक्स्प्लोर

एमएमआरडीएला अंधारात ठेवत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती?

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात एमएमआरडीएला अंधारात ठेवत बाळासाहेब ठाकरे स्मारकाने वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापनाची नियुक्ती केल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिवाजी पार्कजवळील जुन्या महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीए प्रशासनाने जरी 100 कोटींची तरतूद केली असली तरी एमएमआरडीएला अंधारात ठेवत बाळासाहेब ठाकरे स्मारकाने वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापनाची नियुक्ती केल्याचं समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. 'शंभर कोटींच्या प्रकल्पासाठी जागतिक स्पर्धा भरवत एकापेक्षा एक असे सरस वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन निवडण्याची संधी शासनाने गमावली आहे. उद्धव ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नेमणूक कशी करु शकतात?' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक बाबत विविध माहिती मागितली होती. यात वास्तुविशारद आणि सल्लागार नेमण्यासाठी दिले गेलेली निविदा किंवा जाहिरात याची माहिती मागितली होती. मात्र, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासामार्फत आभा नारायण लांबा अँड असोसिसट्स यांची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याने त्याबाबत एमएमआरडीएकडे माहिती उपलब्ध नाही, असं एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांना कळवलं. VIDEO | उपमुख्यमंत्रिपदाबाबत आत्ता बोलणं योग्य नाही : सुभाष देसाई बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षांनी एमएमआरडीए प्रशासनाच्या महानगर आयुक्तांना 1 मार्च 2019 रोजी लिहिलेल्या पत्रात स्मारकाचा सविस्तर आराखडा तयार करणे, अंदाजपत्रक बनवणे, निविदा प्रक्रिया तयार करुन सदर स्मारक पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी आभा नारायण लांबा अँड असोसिसट्स यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक यांनी केल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीने आभा नारायण लांबा अँड असोसिसट्स यांची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व पारदर्शक प्रक्रिया पूर्ण करुन केली आली आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे स्मारक संस्थेने मेसर्स आभा नारायण लांबा अँड असोसिएटस यांच्याशी करारनामा सुद्धा केला आहे. स्मारकाने एमएमआरडीए प्राधिकरणास मेसर्स आभा नारायण लांबा अँड असोसिएटस यांना त्यांचे व्यावसायिक शुल्क देण्याची विनंती केली आहे. स्मारकासाठी कोणताही विरोध नसून वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापनाची नियुक्ती जागतिक स्पर्धा भरवत न केल्याचं दुःख अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे. एमएमआरडीए प्राधिकरण हे यासाठी सक्षम असताना स्मारकाने अशी नियुक्ती करणं योग्य नसल्याचं गलगलींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
Gunaratna Sadavarte : जरांगेंचा शो फेल, एकनाथ शिंदे-उदय सामंत यांचा शो जनतेने नाकारला; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
जरांगेंचा शो फेल, एकनाथ शिंदे-उदय सामंत यांचा शो जनतेने नाकारला; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Embed widget