एक्स्प्लोर

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेंवर दुसरा गुन्हा दाखल; मानसिक तपासणी होणार

Badlapur Case : आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची बाब तपासातून समोर आली आहे.

बदलापूर: राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेविरोधात (Badlapur Case Accused Akshay Shinde) दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एका चिमुकलीवर केलेल्या अत्याचारानंतर त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला (Akshay Shinde) अटक करण्यात आली आहे. आता आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने अत्याचार केल्याची बाब तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीकडून अक्षय शिंदेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्येच आहे. 

अक्षय शिंदेंची पोलीस मानसिक तपासणी करणार

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याची पोलिसांकडून मानसिक तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत एसआयटीने न्यायालयात अर्ज दाखल केलेला असून न्यायालयाच्या परवानगीनंतर ही तपासणी करण्यात येणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?

बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचं निलंबन करण्यात आलं आहे. बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. 

बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला. दरम्यान, शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. 

12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असं चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय... सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget