एक्स्प्लोर

Baba Siddique Murder Case Updates: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: झिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परब यांचाही उल्लेख; म्हणाले, बैठकीत विकासकांनी...

Baba Siddique Murder Case Updates: माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. 

Baba Siddique Murder Case Updates: महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. 

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक मोठे दावे करण्यात आले आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकीने बाबा सिद्दीकींच्या हत्येचा संबध हा वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. तसेच झिशान सिद्दीकींच्या जबाबात उबाठा नेते अनिल परब यांच्या ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतल्याचाही उल्लेख आहे. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते, पण त्यानंतर ते तसं करणार नसल्याचं लक्षात आलं, असं झिशानने जबाबात म्हटलं आहे. 

झिशान सिद्दीकींच्या जबाबात काय?

झिशान सिद्दीकी पोलीस जबाबात म्हटलंय की, मी वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांविरुद्ध सतत आवाज उठवत होतो आणि निषेध करत होतो. मी स्थानिक आमदार होतो, त्यामुळे नागरिकांचा मुद्दा मी मांडत होतो.  या काळात, माझा कोणताही दोष नसतानाही खेरवाडी पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाच्या विकास आराखड्याचे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी महासभेच्या ठरावासाठी तेथे राहणाऱ्या लोकांची बैठक बोलावली. त्यावेळी ते म्हणाले की, जर तुमचा माझ्यावर (अनिल परब) विश्वास असेल तर मी कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला आणीन, तुम्ही त्याला मान्यता द्या...त्यानंतर, मी (झीशान सिद्दीकी) पुन्हा तिथे राहणाऱ्या लोकांसोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितले की तुम्ही कोणताही बिल्डर निवडू शकता पण बिल्डर निवडण्यापूर्वी कागदपत्रे वाचा आणि कोणत्याही दबावाशिवाय त्यावर सही करा. यानंतर, पृथ्वी चव्हाण नावाच्या एका विकासकाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला आश्वासन दिले की काळजी करू नका आणि आम्ही त्याच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना घरांच्या बदल्यात घरे देऊ...यानंतर मी महासभेच्या ठराव बैठकीतही भाग घेतला, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

पृथ्वी चव्हाणने माझ्या वडिलांसोबत बोलताना असभ्य भाषा वापरली-

विकासक पृथ्वी चव्हाण, त्यांचे भागीदार नबील पटेल, अनिल परब हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी विकासकाने तिथे राहणाऱ्या लोकांना आश्वासन दिले की त्यांना त्याच ठिकाणी घरं मिळतील. यानंतर, तिथे राहणाऱ्या लोकांकडून मला कळले की करारात त्यांची दिशाभूल केली जात आहे आणि करार वाचताना त्यांना असे मुद्दे दिसले ज्यामध्ये असे लिहिले आहे की तिथे राहणाऱ्या लोकांना मुंबईत कुठेही घरे देता येईल. यानंतर, तिथल्या लोकांमध्ये असंतोष होता. तिथल्या लोकांनी मला असेही सांगितले की त्यांना कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडले जात आहे. त्यांच्या विनंतीवरून मी तिथे पोहोचलो आणि तिथल्या लोकांना सांगितले की त्यांनी त्यांना जे योग्य वाटते ते करावे आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये. यानंतर, खेरवाडी पोलिस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्याविरुद्ध खोटा खटला दाखल केल्यानंतर विकासक पृथ्वी चव्हाण माझ्या वडिलांशी बोलला आणि असभ्य भाषा वापरली. तुमचं काय आहे?, मला वाटेल ते मी करेन, असं पृथ्वी चव्हाण म्हणाला. त्यानंतर सकाळी पोलीस माझ्या घरी आले इतकेच नाही तर माझ्यावर  आरोपही करण्यात आले. ज्ञानेश्वर नगरमध्ये आमदार निधीतून मी सुरू केलेले काम खेरवाडी पोलिसांनी थांबवले आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतले. नियमांनुसार, कोणतेही सरकारी काम थांबवण्यासाठी संबंधित सरकारी विभागाशी संपर्क साधावा लागतो. पोलिसांकडून पोलीस संरक्षण मागितले जाते आणि नंतर काम थांबवले जाते परंतु या प्रकरणात सरकारी विभागाने काम थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारे पोलिसांना कळवले नव्हते, असा दावा झिशान सिद्दीकींनी जबाबात केला आहे. 

संबंधित बातमी:

Baba Siddique Murder Case Updates: हत्या होण्याच्या काही तासांआधी बाबा सिद्दीकींनी डायरीत ते नाव लिहिलं; धक्कादायक माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget