एक्स्प्लोर
नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी एटीएसचं 6843 पानी आरोपपत्र
यूएपीए, विस्फोटक पदार्थांचा कायदा, आर्म्स ॲक्ट आणि आयपीसी अंतर्गत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.
मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी तपास करणाऱ्या एटीएसने मुंबईच्या एनआयए कोर्टात बुधवारी आरोपपत्र दाखल केलं. सहा हजार 843 पानांचं हे आरोपपत्र असून यात एकूण 12 आरोपींचा उल्लेख आहे.
हे आरोपी सनातन संस्था तसंच हिंदू जनजागृती समिती आणि तत्सम संघटनांचे सदस्य असल्याची माहिती एटीएसने आरोपपत्रात दिली आहे. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी टोळी तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यूएपीए, विस्फोटक पदार्थांचा कायदा, आर्म्स ॲक्ट आणि आयपीसी अंतर्गत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.
मुंबई आणि पुणे या शहरांत घातपात करणार अशी माहिती मिळाल्यानंतर एटीएसने आधी नालासोपारा आणि मग राज्यभरात ही कारवाई केली होती.
आरोपींची नावं
1) शरद कळसकर
2) वैभव राऊत
3) सुधन्वा गोंधळेकर
4) श्रीकांत पांगारकर
5)अविनाश पवार
6) लीलाधर लोधी
7)वासुदेव सूर्यवंशी
8) सुजीथ कुमार
9) भारत कुरणे
10) अमोल काळे
11) अमित बड्डी
12) गणेश मिस्किन
कोणाकडे काय सापडलं?
- शरद कळसकर
घरी बॉम्ब बनवण्याची कृती असलेल्या दोन हस्तलिखित चिठ्ठ्या
- वैभव राऊत
20 जिवंत गावठी बॉम्ब
दोन जिलेटिन कांड्या
चार इलेक्ट्रिक डिटोनेटर्स
22 नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर्स
POISON लिहिलेल्या एक लिटरच्या दोन बाटल्या
वेगवेगळ्या स्फोटक पावडरी
- श्रीकांत पांगारकर
शस्त्रसाठा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
तपासादरम्यान नालासोपारा-ठाणे, नातेपुते-सोलापूर, सातारा, साकळी जळगाव या ठिकाणांहून पुढील गोष्टी जप्त
23 जिवंत गावठी बॉम्ब
15 पिस्तुल
1 बॅरल
6 पिस्तुल मॅग्झीन
3 अर्धवट पिस्तुल मॅग्झीन
7 पिस्तुल स्लाईड
41 जिवंत काडतुसं
गावठी बॉम्ब
मेमरी कार्ड्स
8 मोटार वाहनांच्या नंबर प्लेट्स
‘क्षात्रधर्म साधना’ पुस्तकाच्या प्रती
डायऱ्या
पुणे, नालासोपारा-ठाणे, सातारा, कोवाड-कोल्हापूर, बीड इथून दोन मोटार कार, पाच मोटार सायकली तसंच मोटार सायकलीचे तोडून वेगळे केलेले भाग जप्त करण्यात आले आहेत.
सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीबद्दल आरोपपत्राबद्दल एटीएसनं आरोपपत्रात म्हटलं आहे—
तपासादरम्यान आरोपी हे सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि अन्य काही तत्सम संघटनांचे सदस्य असून ते सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हिंदू राष्ट्र निर्मितीच्या उद्देशानं प्रेरित आहेत. त्यांनी आपापसात संगनमत करुन समविचारी युवकांची दहशतवादी टोळी निर्माण केल्याचं आढळून आलं आहे. सदर दहशतवादी टोळी भारताची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांना धोका पोहचवण्याच्या उद्दिष्टाने देशी बनावटीचे पिस्टल, गावठी बॉम्ब इत्यादीचा वापर करुन तथाकथित हिंदू धर्म, रुढी, प्रथा यांच्या विरोधात विडंबन, वक्तव्य, लिखाण करणाऱ्या व्यक्ती आणि कार्यक्रमांना लक्ष्य करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचं आढळून आलं आहे.
याचाच एक भाग म्हणून डिसेंबर 2017 मध्ये पुणे येथे आयोजित पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार करणारा ‘सनबर्न’ या संगीताच्या कार्यक्रमास आरोपींनी लक्ष्य करुन या कार्यक्रमात गावठी बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, अग्निशस्त्र तसंच दगडफेक इत्यादीद्वारे घातपाती कारवाया करुन जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या ठिकाणी रेकी केली होती. तसेच घातपाताची तयारीही केली, पण एक आरोपी रेकी करताना सीसीटीव्हीच्या कॅमेरात आल्याच्या संशयावरुन पूर्ण तयारी होऊनही घातपाताची योजना रद्द झाली, असं तपासात निष्पन्न झालं. तसंच सदर दहशतवादी टोळीनं हिंदू धर्म, धर्म, रुढी, परंपरा यावर टीका टिप्पणी करणारे साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक व्यक्ती यांना लक्ष्य करुन त्यांचीही रेकी केल्याचं तपासात उघड झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement