एक्स्प्लोर

अश्विनी बिद्रे हत्या : खडसेंच्या भाच्याचा जामीन फेटाळला

भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या राजेश पाटील यांचा जमीन अर्ज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याच्या जामीन अर्जावर न्यायामूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला 10 डिसेंबर 2017 रोजी अटक करण्यात आली होती. पाटीलवर हत्येत सहभाग आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सध्या पाटील तळोजा जेलमध्ये आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांचे धड आणि हात, पाय, मुंडके वेगळे करण्यात आले होते. अशी माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकण्यापूर्वी अभय कुरुंदकरच्या भाईंदरच्याच घरातील फ्रीजमध्ये ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी अभय कुरुंदकरसह राजेश पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक केली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे. नेमकं काय प्रकरण आहे? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून  वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. अश्विनी जयकुमार बिद्रे... कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी. त्या 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं. अश्विनी आणि अभय यांच्यात वाद अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदकरने भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर तात्काळ रजेवर गेला. संबंधित बातम्या : अश्विनी बिद्रे हत्या : चॅटिंगमधील एका अक्षरामुळे कुरुंदकरचा गेम ओव्हर डोक्यात बॅट घालून अश्विनी बिद्रेंची हत्या, आरोपी कुरुंदकरच्या मित्राची कबुली बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget