एक्स्प्लोर

'वख्खा विख्खी वुख्खू' कसं सुचलं? अशोक सराफ म्हणतात....

संपूर्ण महाराष्ट्रासह चित्रपटसृष्टीला हवाहवासा वाटणारा खोकल्याचा ठसका अर्थात 'वख्खा विख्खी वुख्खू' हे कसं सुचलं, याचा उलगडा दस्तुरखुद्द मराठी चित्रपटसृष्टीचे अमिताभ अर्थात अशोक सराफ यांनी केला.

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रासह चित्रपटसृष्टीला हवाहवासा वाटणारा खोकल्याचा ठसका अर्थात 'वख्खा विख्खी वुख्खू' हे कसं सुचलं, याचा उलगडा दस्तुरखुद्द मराठी चित्रपटसृष्टीचे अमिताभ अर्थात अशोक सराफ यांनी केला. 'शेन्टिमेंटल' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी 'माझा कट्टा'वर गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अशोकमामा नाव कसं पडलं, लक्ष्मीकांत बेर्डेसोबतचं ट्यूनिंग, निवेदिता सराफ यांच्यासोबतची ऑफस्क्रीन केमिस्ट्री यासह सर्व मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांना 'वख्खा विख्खी वुख्खू' याबद्दलही विचारण्यात आलं. वख्खा विख्खी वुख्खू' कसं सुचलं? अशोक सराफ म्हणतात.... अभिनयसम्राट अशोक सराफ यांच्या धूमधडाका या प्रचंड गाजलेल्या सिनेमातील हा तितकाच गाजलेला 'वख्खा विख्खी वुख्खू'चा ठसका. मात्र हा ठसका स्क्रीपट्मध्ये अजिबात नव्हता. टाईमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अशोकमामांनी त्या आयत्यावेळी समाविष्ट केलं. वख्खा विख्खी वुख्खू' कसं सुचलं? अशोक सराफ म्हणतात.... त्याबाबत अशोक सराफ म्हणाले, "तोंडात स्मोकिंग पाईप घेऊन डायलॉग म्हणायचा होता. मात्र सिगरेट आणि पाईपमध्ये असलेला तंबाखूमध्ये फरक असतो. पाईपमधील तंबाखू खूपच तीव्र असतो. तो ओढल्यानंतर घशातून ठसका बाहेर येतो. ज्यावेळी संवाद बोलायचा होता, त्यावेळी मला ठसका आला आणि मी त्याच वेगात संवादही सादर केले. थोडं थांबून हे चांगलं होतंय असं कळल्यानंतर, तीच स्टाईल त्या सिनेमात पुढे कायम ठेवली. प्रेक्षकांनीही त्या स्टाईलला दाद देऊन ती अजरामर केली". लक्ष्मीकांत बेर्डे यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेच्याही आठवणी सांगितल्या. लक्ष्मीकांत बेर्डे हा जबरदस्त माणूस होता. सिनेसृष्टीची काहीही पार्श्वभूमी नसताना, त्याने सर्व काही संघर्ष करुन मिळवलं. वख्खा विख्खी वुख्खू' कसं सुचलं? अशोक सराफ म्हणतात.... लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा फॉलोअर होता. टायमिंग कशी साधायची हे मला माहित होतं. आम्ही दोघांनी जवळपास 40-50 सिनेमे सोबत केले. त्यामुळे त्याने माझ्यासोबतचं ट्यूनिंग जमवून घेतलं. त्याचा हजरजबाबीपणा आणि टायमिंग हे जबरदस्त होतं. त्यामुळेच त्याची वेगळी छाप कायम राहिली, असं अशोक सराफ म्हणाले. अशोक सराफचा अशोकमामा कसा झाला? अशोक सराफ हे सिनेसृष्टीला अशोकमामा म्हणून परिचीत आहेत. मात्र त्यांना मामा म्हणायला कोणी सुरुवात केली, याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. वख्खा विख्खी वुख्खू' कसं सुचलं? अशोक सराफ म्हणतात.... ते म्हणाले, "मी एका सिनेमाच्या शुटिंगसाठी कोल्हापूरला होतो. तिथे प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो दररोज त्याच्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर यायचा. तिथे आल्यावर तो माझ्याकडे बोट करुन त्या मुलीला सांगायचा, हे कोण तर अशोकमामा. त्यामुलीपाठोपाठ स्वत: प्रकाशही मला अशोकमामा म्हणायला लागला. त्यावेळी सेटवर असलेल्या इतर क्रू मेंबर्सनाही मला काय म्हणायचं याची पंचाईत होती. ते थेट अशोक म्हणू शकत नव्हते, आणि अशोक साहेब हे शोभत नव्हतं. त्यामुळे त्यांनीही मला अशोकमामा म्हणायला सुरुवात केली आणि बघता बघता सगळीकडे मी अशोक मामा म्हणूच ओळखायला लागलो" मात्र हे बरं आहे की माझा 'मामा' कोणी केला नाही, अशी हास्यकळी त्यांनी फुलवली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
Devendra Fadnavis and Ashwini Bhide: मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाडलं पत्र
मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप; देवेंद्र फडणवीस यांना धाडलं पत्र

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Embed widget