Maharashtra News : मुंबईत भाजप (BJP) कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कारसमारंभ आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. 


भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? त्यानंतर ते म्हणाले की, "तीच संस्कृती, तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच परंपरा... पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सर्वांनी पाहिलं." तसेच, काल दहीहंडी जोरात साजरी झाली. त्याचप्रमाणेच पुढील सणही जोरात साजरे करायचे आहेत, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत." 


भाजप कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचं अभिनंदन केलं. यावेळी ते म्हणाले की, "आशिष शेलार अतिशय अनुभवी आहेत. मुंबईत प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलंय. तरी त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवण्याचा निर्णय पक्षानं घेतला. याचं कारण काय, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. छत्रपतींच्या इतिहासात जेव्हा एखादी मोहीम असायची आणि स्वराज्याकर्ता ती मोहीम अत्यंत महत्त्वाची असायची, त्यावेळी महाराज आपल्या शिलेदारांपैकी बिमीचा शिलेदार निवडायचे आणि त्याला सांगायचे, जा आणि मोहीम फत्ते करुन ये." पुढे बोलताना ते म्हणाले की, "केंद्रीय भारतीय जनता पक्षानं आपला बिनीचा शिलेदार आशिष शेलार याला सांगितलं आहे. मुंबई महानगर पालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. तुम्ही मुंबईचं अध्यक्षपद स्विकारा." 


"गेल्यावेळीही त्यांनी अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महापालिकेत आपण मारली. त्यावेळीही महापौर आपण बनवू शकलो असतो, आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षाकर्ता आपण निर्णय घेतला आणि आपण दोन पावलं मागे गेलो. त्यांना महापौर बनवू दिला. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच महापौर बनेल, भगवा लागेल. पण कोणती शिवसेना, तर माननिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची यांच्या विचारांवर चालणारी शिंदेंच्या नेतृत्त्वातील खरी शिवसेना.", असं फडणवीस म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :