शहापूर : अनेकदा म्हटलं जातं, की गरज ही शोधाची जननी आहे. किंबहुना याचा प्रत्यय देणारी उदाहरणंही आपल्या डोळ्यांसमोर आहेत. यातच आता आणखी एका उदाहरणाची भर पडली आहे. पेट्रोल महाग झाल्याने वाहन चालवणं परवडत नसल्यामुळे शहापूर तालुक्यातील सुनील घरत यांनी पहिली इलेक्ट्रिक प्रदूषण मुक्त बाईक बवण्याची किमया केली. अनेक कंपन्यांनी महागड्या इलेक्ट्रिक स्कुटी बनवल्या आहेत परंतु कमी पैसे खर्च करून सुनिल घरत यांनी बनवली इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे . 


3:30 मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर लाईटचा एक युनिट खर्च होणार म्हणजे अगदी 10 रुपयामध्ये 50 किमी ताशी बी बाईक/ दुचाकी वेगाने 70 किमीचं अंतर कापू शकते. BLC.DC - 750 W  मोटर्स,  48.V - 30 Ah  Lithum Fospete Life Pro बॅटरी,  750 W  कंट्रोलर, कन्व्हर्टर, Led लाईट्स, 28 ard free व्हील यांसारखी सामग्री वापरून ही इलेक्ट्रिक बाईक तयार करण्यात आली आहे. 


आपल्या कामाकरता सुनील घरत यांना शहापूर तालुक्यात फिरावे लागत असून अनेकदा त्यांची फार धावपळ होते. त्यातच मोटरसायकल वरून फिरत असताना रोज 100  ते 150 रुपयांचे पेट्रोल लागत असायचे त्यामुळे, घरत यांनी विचार केला की एक इलेक्ट्रीक स्कुटी घ्यावी. यासाठी ते इलेक्ट्रिक स्कुटी विक्रेत्याच्या दुकानातही गेले. परंतु, स्कुटीच्या किंमती विचारल्या तर एका स्कुटीची किंमत 95 हजार, दुसऱ्या एका मॉडेलची किंमत 1 लाख 14 हजार.  ही किंमत काहीशी अवाक्याबाहेरच्या असल्यामुळं मग घरत यांनी आपल्या जुन्या बाईकला जुगाड करून इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचा निर्णय घेतला. 


कंपनी जेव्हा आपल्याला गाडी विकते, त्यावेळी त्यांची किंमत अफाट असते. मात्र त्यानंतर आपल्या गाडीची किंमत ते कवडी मोल पकडतात. त्यामुळे घरत यांनी इलेक्ट्रिक गाडी मध्ये काय मटेरियल लागतं त्या संदर्भात माहिती घेतली, गाडीचे चांगले निरीक्षण केले. तेव्हा इलेक्ट्रिक गाडी मध्ये इंजिन नसून महत्वाचे घटक म्हणजे एक बॅटरी आणि त्यावर चालणारी Dc मोटार आणि एक कंट्रोलर अशा या 3 गोष्टी असतात हे त्यांना समजले. 


Maharashtra Coronavirus : 'या' सहा राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय


इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील माहिती असल्याने घरत याने इलेक्ट्रिक बाईक बनवण्यास सुरुवात केली रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत विचार करत गाडी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यानी भिवंडी, उल्हासनगर, मुंबई पर्यंत अनेक दुकानदारांपर्यंत पोहोचले परंतु सर्व साहित्य काही मिळाले नाही त्यानंतर दिल्ली आणि कोलकाता येथून सर्व साहित्य गोळा करून घरत यांनी आपला प्रयोग सुरू केला. वेल्डिंग मशीन, ग्राईंडर, ड्रिल मशिन इत्यादी  सामानाचा वापर करत घरत यांनी सुमारे 8 दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन ही इलेक्ट्रिक बाईक बनवली. तयानंतर मुंबई मध्ये 48.V Lithum Fospete बॅटरी ही 22 हजारात मिळवली आणि त्यांची इलेक्ट्रिक बाईक तयार झाली. इलेक्ट्रिक बाईक बनवायची आणि जनतेसमोर काहीतरी वेगळे करून दाखवायचे असे ठरवले आणि तो जुगाड आपण 100% पूर्ण केला याचा आनंद त्यांना आहे.