खादीला प्रोत्साहन देण्याचं मोदी सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कार्यालयांमध्ये यावं, अशा प्रकारचं आवाहन काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून करण्यात आलं होतं. खादी आणि ग्रामविकास महामंडळाला केंद्र सरकारने सूचना केल्या होत्या. यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसेल.
दर शुक्रवारी खादीचे कपडे घाला, सरकारी कर्मचाऱ्यांसमोर प्रस्ताव
देशात खादी उद्योगावर 35 लाखाहून अधिक कामगारांचं पोट चालतं. त्यामुळे कर्मचाऱ्याने एक खादीचा ड्रेस खरेदी केल्यास या उद्योगाला चालना मिळू शकते.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांना खादीचे कपडे घालण्याचं आवाहन केलंय. आता सरकारच्या या आवाहनाला अधिकारी कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.