एक्स्प्लोर

मुंबईत मराठी शाळांची पुन्हा गळचेपी, गोरेगावातील विद्यामंदिर मराठी शाळा बंद होणार?

26 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर पालक दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र गोरेगाव, जोगेश्वरीमधील इतर तीन मराठी शाळा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊ शकत नाही, असं कारण देत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचा पालकांचे म्हणणं आहे.

मुंबई : गोरेगावमधील जुन्या मराठी शाळांमधील विद्यावर्धिनी विद्यामंदिर मराठी शाळा अचानक बंद करण्यात येत असल्याचं संस्थाचालकांनी पालकांना सांगितलं आहे. त्यामुळे शाळेतील जवळपास 350 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. शाळेची इमारत धोकादायक झाल्याचं सांंगून संस्थाचालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा सुरु ठेवण्याचे सर्व पर्याय अवलंबून पाहिले मात्र ते यशस्वी न झाल्याने अखेर शाळा बंद करणार असल्याचं संस्थाचालकांनी पालकांना सांगितलं. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश द्यावा, असा सल्लाही संस्थाचालकांकडून देण्यात येत आहे.

26 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर पालक दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र गोरेगाव, जोगेश्वरीमधील इतर तीन मराठी शाळा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊ शकत नाही, असं कारण देत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचा पालकांचे म्हणणं आहे.

मराठी शाळा वाचविण्यात यावी यासाठी पालक आग्रही आहेत. त्यासाठी स्थानिक आमदार-खासदार यांच्यासोबत बैठकीचं नियोजन पालकांनी केलं होते. मात्र संस्थाचालकांनी उपस्थित राहण्यास नकार दिल्याने नियोजित बैठक होऊच शकली नाही. त्यामुळे पालकांनी शाळा वाचविण्यासाठी संस्थाचालक आग्रही नसल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे संस्थाचालकांनी आपण शाळा बंद न करता सुरु ठेवण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र इमारत धोकादायक असल्याने या इमारतीची डागडुजी करावी लागणार आहे. यासाठी आम्ही इतरत्र शाळा काही दिवसासाठी हलविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते शक्य न झाल्याने आता या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही इतर शाळांत प्रवेश घेण्यास सांगितल्याचे संस्थाचालकांचं म्हणण आहे.

विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेशासाठी अडचण येत असल्यास आम्ही मदत करत असल्याचंही संस्थाचालकांनी सांगितलं. संस्थाचालक शाळेची जागा बिल्डरला विकणार असल्याचा आरोप पालक करत आहेत. मात्र संस्थाचालक याबाबत बोलायला तयार नाहीत. संस्थाचालकांच्या या भूमिकेमुळे 350 मुलांचे भविष्य अंधारात असल्याचं पालकांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Embed widget