एक्स्प्लोर

महापौर बंगल्यापाठोपाठ आणखी एक भूखंड बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाला

मुंबई महापालिकेच्यावतीने शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय स्मारक या सार्वजनिक न्यासाला महापौर निवासाची जागा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे.

मुंबई : शिवाजी पार्क इथल्या केरळीय महिला समाजाच्या ताब्यात असलेला मोकळा भूखंडही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या न्यासाला देण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याआधीच शिवाजी पार्कमधील महापौर निवासस्थानाची जागाही बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाला देण्यात आली आहे.
केरळीय समाजाच्या ताब्यातील 362 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा काढून बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाला दिली जाणार आहे. त्या बदल्यात केरळीय महिला समाजाला प्रभादेवी येथील आयटी पार्कच्या जागेत 81 चौरस मीटरची जागा देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. अशारितीने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आणखी एक मोकळा भूखंड महापालिकेने ठाकरे कुटुंबियांच्या झोळीत टाकला आहे.
मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रीय स्मारक या सार्वजनिक न्यासाला महापौर निवासाची जागा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नगर भू क्रमांक 501, 502 पैकी आणि नगर भू क्रमांक 1495 धारण करणाऱ्या महापौर निवासाची जागा आणि इतर वापरात असलेल्या सुमारे 11 हजार 551.01 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा शासनाने स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाला 1 रुपया प्रतिवर्षी नाममात्र दराने देण्यात आली आहे. त्यानुसार 11 हजार 551.01 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेचा ताबा नोव्हेंबर 2018 रोजी न्यासाला देण्यात आला. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन 23 जानेवारी 2019 रोजी त्याचे हस्तांतरण न्यास समितीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. आता केरळीय महिला समाजाच्या ताब्यात असलेला 362 चौ.मी. भूखंडही न्यासाला मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget