एक्स्प्लोर

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीनावरील सुनावणी हायकोर्टाकडून दोन आठवड्यांसाठी तहकूब

Anil Deshmukh Money Laundering Case : अनिल देशमुखांच्या जामीनावरील सुनावणी हायकोर्टाकडून दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.

Anil Deshmukh Money Laundering Case : अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) जामीनावरील सुनावणी हायकोर्टाकडून दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली. जर अनिल देशमुखांचा जामीन जर वैद्यकीय कारणांवर आधारीत असेल तर आम्ही केवळ वैद्यकीय कारणंच ऐकू. त्यामुळे देशमुखांच्या वैद्यकीय व्याधींबाबत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश त्यांच्या वकिलांना न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई जारी केले आहेत. देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी ही सुनावणी लवकर घेण्याची विनंती हायकोर्टाकडे केली. मात्र "तुमच्या आधी आलेले अनेक अर्ज प्रलंबित आहेत, त्यांना डावलून तुमचा अर्ज तातडीनं घेणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या कारणांसाठी तातडीचा वैद्यकीय जामीन आहे ते अर्जाद्वारे मांडा", असं स्पष्ट करत न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी ही विनंती फेटाळून लावली. 

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड' आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेल्या वारेमाप संपत्तीचा स्त्रोत काय?, याचं देशमुखांना स्पष्टीकरण देता आलेलं नाही, असा दावा अंमलबजावणी संचालनालयानं (ED) देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत एएसजी अनिल सिंह यांनी स्पष्ट केलं की, देशमुखांच्या अर्जावरील प्रत्येक मुद्यावर त्यांच्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे. त्यामुळे जेव्हा सुनावणी होईल तेव्हा ते आपली भक्कम बाजू कोर्टापुढे सादर करतील.

ईडी तपास करत असलेल्या प्रकरणांत अनिल देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्‍यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकलाय. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्यानं त्यांना जामीन देऊ नये, असा ईडीचा दावा आहे. याशिवाय देशमुखांपेक्षाही वयानं मोठे असलेले अनेक आरोपी जेलमध्ये आहेत, त्यामुळे वाढत्या वयाचा दाखला देऊन जामीन मागणं चुकीचं असल्याचं ईडीनं स्पष्ट केलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीएमएलए न्यायालयाने 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. प्रकृता अस्वस्थाचं कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुस-याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे केली आहे. अनिल देशमुख यांनी सीबीआयनं नुकतीच अटक केली असून 11 एप्रिलपर्यंत त्यांना सीबीआय कस्टडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget