Anil Deshmukh Latest News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई सत्र न्यायालयाचा झटका दिला आहे.  खासगी हॉस्पिटलऐवजी जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital) खांद्यावरील शस्त्रक्रियेस कोर्टानं परवानगी दिली आहे.  ईडीने सादर केलेला देशमुखांचा वैद्यकीय अहवाल निर्णायक ठरला आहे. खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलं होतं. 


मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयानं आपला निर्णय सुनावला. देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर  खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी  न्यायालयाकडे केली होती. 


मात्र ईडीनं याला विरोध केला होता. ईडीनं देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल कोर्टात सादर केला होता. तसेच खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीनं दावा केला होता.  अनिल देशमुख मात्र खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यावर ठाम होते. मात्र कोर्टानं त्यांना झटका दिला असून आता त्यांना जेजे रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे. 


आधी अनिल देशमुखांच्यावतीनं घरचे जेवण मिळावं म्हणून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आला होता.  खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीनं उत्तर देण्यास वेळ मागितला होता. घरच्या जेवणासाठी ईडीनं विरोध केला नव्हता मात्र कोर्टानं याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं ईडीनं म्हटलं होतं.   


इतर महत्वाच्या बातम्या


नवनीत राणांना स्पॉंडिलायसिस, अनिल देशमुखांना खांदेदुखी तर मलिकांना मुत्राशयाचा विकार; उपचारासाठी मागितल्या परवानग्या


Anil Deshmukh : अनिल देशमुखांनी क्लीनचिट?, चांदीवाल कमिशनचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला


अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे 16 एप्रिलपर्यंत सीबीआयच्या ताब्यात