काल रात्री सव्वा बारा वाजल्यापासून सिद्धिविनायकाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती बाप्पाची खास पूजा बांधण्यात आली.
मंदिराला आकर्षक रोषनाईसह विविध रंगीबेरंगी फुलांची आरास घालून सजवण्यात आलं.
दुसरीकडे भाविकांच्या सुरक्षेततेसाठी सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी मुखदर्शनाची सोयही करण्यात आली.
सिद्धिविनायक मंदिर आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. सोबतच मंदिर प्रशासनाकडून भक्तांच्या सोयीसाठी दादर, एल्फिन्स्टन स्थानकाहून मोफत बस सेवा पुरवण्यात येत आहेत.
दर्शन रांगेचा मार्ग
पुरुषांसाठी - रवींद्र नाट्य मंदिरापासून सुरू
महिलांसाठी - दत्ता राऊळ मैदानापासून व्यवस्था
गर्भवती महिला, दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी - पेट्रोल पंपाच्या समोरच्या गेटमधून प्रवेश
दुरून दर्शन घेणाऱ्यांसाठी - पोर्तुगीज चर्चच्या फुटपाथपासून, त्यासोबतच, रेल्वेने येणाऱ्या भक्तांसाठी एलफिन्स्टन आणि दादर रेल्वे स्थानकापासून बेस्टची विनामूल्य सेवा मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
दर्शनाची वेळ :
आज (३ एप्रिल) मध्यरात्री पूजेनंतर रात्री दीड वाजल्यापासून ते उद्या (४ एप्रिल) रात्री 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी प्रवेश सुरू राहील. नैवद्य आणि मधल्या आरतीचा वेळ सोडल्यास 24 तास दर्शन सुरू राहणार.