वसई : वसई-विरारमधील अनधिकृत बांधकमांना आमदार हितेंद्र ठाकूर जबाबदार आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. चाळमाफियांवरी कारवाईबाबत माहिती देण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी हितेंद्र ठाकूरांवर थेट आरोप केला.
वसईच्या राजवली भोईदापाडा येथील चाळमाफियांनी उभारलेल्या शासकीय जमिनीवरील चाळीवर 3 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत कारवाई करण्याचं आश्वासन वन, महसूल, पालिका आणि पोलिसांनी दिल्याचं मनसेनं आज पत्राकर परिषद घेऊन माहिती दिली.
यावेळी मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई-विरार क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांना वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर जबाबदार असल्याचा थेट आरोप केला. आर्थिक गणितातून हितेंद्र ठाकूरांनी दिलेल्या पांठिब्यामुळेच हे सर्व उभं राहिल्याचही आरोप जाधव यांनी यावेळी केला.
अनधिकृत चाळी बनवत असताना ज्यांनी ज्यांनी डोळे बंद केले, ते मग पोलिस, महसूल, पालिका किंवा वन विभागाचे अधिकारी असतील, त्या सर्वांवर कारवाईची मागणीही यावेळी मनसेने केली आहे. यावेळी मनसेनं पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन आणि वडोदरा एक्सप्रेस वेची एकही विट रचू देणार नसल्याचंही सांगितलं.