मुंबई : अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आग दुर्घटनेनंतर काचेने आच्छादित इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काचेची तावदानं असलेल्या इमारतींवर बंदी घातल्याच्या निर्णयाचा मुंबई महापालिकेलाच विसर पडल्याचं दिसत आहे.
मुंबईत काचेची आच्छादने (ग्लास फसाड) असलेल्या इमारतींवर 2012 मध्ये महापालिकेने बंदी घातली होती. मात्र या बंदीनंतरही मुंबईत अनेक ठिकाणी काच अच्छादित टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या आहेत. विशेषत: व्यावसायिक आणि कॉर्पोरेट इमारतींमध्ये ग्लास फसाड (खिडक्यांऐवजी काचा) लावण्यात येत आहेत.
कामगार हॉस्पिटलची इमारतही काचेनं आच्छादली आहे. या इमारतीच्या ग्लास फसाडला पालिकेची परवानगी नव्हती.
काचेच्या भिंतींना आक्षेप का?
काचेमुळे धूर बाहेर पडू न शकल्याने त्यात अडकलेल्या पीडितांचा शोध धेणे अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण जाते. शिवाय आगीच्या उष्णतेमुळे काचा फुटत असल्याने आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाला अडथळे येतात.
काचेच्या इमारतींसाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली होती. 2012 पूर्वी उभ्या राहिलेल्या अशा इमारतींमध्येही सुधारणा करण्यासाठी 120 दिवसांची मुदत देण्यात आली. इमारत प्रस्ताव विभागाने तशा नोटीस सर्व इमारतींना बजावल्या. मात्र सहा वर्षापूर्वी घेतलेल्या या निर्णयाचा विसर पडल्याने आजही काचेची आच्छादने असलेल्या इमारती मुंबईत उभ्या राहत आहेत.
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागात सोमवारी संध्याकाळी भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. 'ईएसआयसी' कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवर दोन तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीत सहा जणांना प्राण गमवावे लागले, तर 147 जण जखमी झाले आहेत.
आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते. धुरात गुदमरल्यामुळे मृत आणि जखमींचा आकडा वाढल्याची माहिती आहे.
याआधी ग्लास फसाडच्या इमारतींमधील दुर्घटना
गोरेगाव 12 मजली टेक्निक प्लस इमारतीच्या भीषण आगीत 4 जणांचा बळी
अंधेरीतील लोटस पार्क इमारतीला भीषण लागली होती. या इमारतीलाही सुशोभित काचा लावण्यात आल्या होत्या.
कामगार रुग्णालय आग : काचेच्या भिंतींची चकाकी जीवावर बेतली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2018 09:41 PM (IST)
इमारत प्रस्ताव विभागाने तशा नोटीस सर्व इमारतींना बजावल्या. मात्र सहा वर्षापूर्वी घेतलेल्या या निर्णयाचा विसर पडल्याने आजही काचेची आच्छादने असलेल्या इमारती मुंबईत उभ्या राहत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -