Andheri Bypoll Result BJP: अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकालानंतर (Andheri Bypoll Result) भाजपने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे अभिनंदन केले आहे. ऋतुजा लटके यांचा विजय भाजपमुळे झाला असून आम्ही निवडणूक लढवली असती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पराभव निश्चित असता असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले. 


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा 53 हजार 471 मताधिक्याने विजय झाला. ही पोटनिवडणुकी दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 


मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय झाला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप व इतर डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊनही 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाला अधिक मतदान झालेच नसल्याचे सांगत भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता असे शेलार यांनी म्हटले. 







अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली. तर, नोटा या पर्यायाला 12 हजार 776 मते मिळाली.  अपक्ष उमेदवार बाळा नाडर यांना 1506 मते मिळाली.  2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मते मिळाली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: