Andheri East Bypoll : आज (6 नोव्हेंबर) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri Bypoll Result 2022)   जाहीर होणार आहे. त्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आघाडीवर आहेत. दरम्यान,  ऋतुजा लटके या मोठ्या परकारनं निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. ऋतुजा लटके यांनी निवडून येऊन साहेबांचं राहिलेल कामं काम पूर्ण करावं असं मत दिवंगत रमेश लटके यांच्या वडीलांनी व्यक्त केले. तर ऋतुजा लटकेंनी लोकांची काम करावी आणि माझ्या मुलाचं नाव करावं असं मत रमेश लटकेंच्या आई यांनी व्यक्त केलं आहे.  यावेळी रमेश लटकेंच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ते दोघेही भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. 

  
बाहरेच्या लोकांची कामे पूर्ण करणे ही आमची अपेक्षा आहे. ऋतुजा लटके यांच्यावर लोकांची कामं करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यांनी माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करावी असे रमेश लटके यांचे वडील म्हणाले. लोकांनीच ऋतुजा लटके यांना उभं केलं आहे. त्यामुळं लोकांच्या मतांवर ती निवडून येणार आहे. लोकांनीच त्यांना राजीनामा द्यायला लावल्याचे मत रमेश लटकेंच्या वडिलांनी व्यक्त केले. तर ऋतुजा लटकेंनी निवडून येऊन लोकांची काम करावी आणि माझ्या मुलाचं नाव करावं असं मत रमेश लटकेंच्या आई यांनी व्यक्त केलं आहे. हे सांगताना त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.


नवव्या फेरीअंती लटके यांना 32 हजार 515 मतं मिळाली 


मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता  सुरुवात झाली आहे आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये सुरु आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. सध्या मतमोजणी सुरु असून ऋतुजा लटके या आघाडीवर आहेत. नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. नवव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर आहेत.  ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित आहे.  नवव्या फेरीअंती लटके यांना 32515 मतं मिळाली आहेत. तर नोटाला 6637 मतं मिळाली आहे.


 3 नोव्हेंबरला झाले होते मतदान 


166 - अंधेरी पूर्व' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत  सुमारे 31.74  टक्के मतदान झाले.   2 लाख  7 हजार  502   मतदारांपैकी 84 हजार 166  मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते.  या निवडणुकीत पडद्यामागून 'नोटा'ला मत टाका, असा प्रचार केला गेला आणि नोटाला काही मत मिळू शकतात याची चर्चा सध्या निकालापूर्वी जोरदार सुरू आहे. तसेच जिंकणाऱ्या उमेदवाराप्रमाणे नोटाला देखील अधिक मत पडतील अशी देखील चर्चा रंगली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Andheri By polls Result 2022: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाची 'लिटमस टेस्ट', कमी मतदानामुळे ठकरेंच्या चिंतेत वाढ?