मुंबई : देशातील चार राज्यांतील निवडणुकांचे (Assembly Election Result) कौल आता समोर आले आहेत. यामध्ये चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजप वरचढ ठरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेश (MadhyaPradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीगड (Chhattisgarh) या राज्यांमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे. यावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली. आता भाजप सगळीकडे नंबर 1 पक्ष असणार असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजप आणि देवेंद्रजी (Devendra Fadanvis) मिळून भाजप सत्तेत आणणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी अमृता फडणवीसांनी दिली. दरम्यान तेलगंणा राज्यात काँग्रेसला यश मिळाल्याचं चित्र आहे. पण इतर 3 राज्यांमध्ये मात्र काँग्रेसची (Congress) पिछेहाट झालीये. 


मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची (Congress In Hindi Belt) सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस 'आऊट' झाल्याचं स्पष्ट झालंय. 


अमृता फडणवीस काय म्हणाल्या?


भाजप आता इथून पुढे सगळीकडे नंबर 1 च पक्ष राहणार. महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आणि भाजप देवेंद्र फडणवीसांच्याच मागे राहणार आणि भाजप आणि देवेंद्रजी मिळून भाजप आणणार. आजचा निकाल हा अपेक्षितच होता. आता इथून पुढे तुम्हाला सगळीकडे भाजपचं दिसेल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. 


आता मन मन मोदी - मुख्यमंत्री शिंदे


 कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केली.  घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं,  असे देखील  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


दरम्यान चार राज्यांतील निवडणूक निकालांमधून भाजपची आघाडी असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या निकालाचा फायदा भाजपला लोकसभेच्या निवडणुकांमध्येही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनता कोणाला कौल देणार हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. त्याचप्रमाणे या निकालानंतर भाजप लोकसभेच्या निवडणुकांसाठी कोणती रणनिती आखणार हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे. 


हेही वाचा :


घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असा निकाल; मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर : मुख्यमंत्री