एक्स्प्लोर

Ajit Pawar : ब्लॅक बॉक्सचं सत्य 'लवकरच' समोर येईल, पण पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले त्याचा CCTV समोर आणा : अमोल मिटकरी

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash : ट्रफिकमध्ये अडकलेल्या पायलटांचा सीटीटीव्ही आणि त्यांचा दिनक्रम महाराष्ट्रासमोर आणावा अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

मुंबई : अजित पवार याच्या विमान अपघातामागे (Ajit Pawar Plane Crash) काही घातपात असल्याचा संशय उपस्थित करणाऱ्या आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आता पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्सचं सत्य समोर येईलच, पण त्याचवेळी दादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.

अजित पवारांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. मात्र, त्यांच्या निधनावर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरींनी शंका उपस्थित केली आहे. अमोल मिटकरींनी आता आणखी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अजितदादांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी बदलण्यात आले. त्यांचे जुने पायलट हे ट्रॅफिकमध्ये फसल्याने त्यांच्या जागी ऐनवेळी दुसरे पायलट देण्यात आले. मात्र आधीचे दोन पायलट, साहिल मदन आणि यश, हे घरातून कधी निघाले? ते कोणत्या गाडीतून बाहेर पडले? ते नेमकं कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये फसले? तसेच मृत्यूमुखी पडलेले सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून कधी निघाले? या सगळ्याचे सीटीटीव्ही जाहीर करावे अशी मागणी अमोल मिटकरींनी केली. 

सगळ्या पायलटांचा दिनक्रम आणि 28 जानेवारी रोजीचे सर्व सीटीटीव्ही फुटेज महाराष्ट्राला कळू द्यावेत अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. सरकार आता त्या मागण्याना कसा प्रतिसाद देतं हे पाहावं लागेल. 

काय म्हटलंय अमोल मिटकरींनी?

अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण! आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू, पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता, कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले, त्या ठिकाणचे सीसटीव्ही फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती."

ब्लॅक बॉक्स तपासासाठी परदेशात पाठवावा लागणार 

अजित पवारांचा अपघात झाला की घातपात घडला याविषयी दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा आहे. त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून पुढे येणाऱ्या माहितीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. मात्र आता या ब्लॅक बॉक्सबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत असून डीकोडिंगसाठी हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवावा लागणार असल्याची माहिती आहे. याबाबत सरकारकडून पुढच्या एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. दरम्यान, विमानाच्या स्थितीबाबत DGCAकडून तपास सुरु असून त्याला अजून 10 ते 15 दिवस लागतील. त्यामुळे ब्लॅक बॉक्ससंदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget