एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर नाही, अमित ठाकरेंनी डोकं टेकलं
या बैठकीत अमित ठाकरे यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच महाव्यवस्थापकांपुढे वाचला. यावेळी मनसेचं शिष्टमंडळासह उपस्थित होतं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईच्या समस्यांवर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. बैठकीत संदिप देशपांडे आणि अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं. आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकलं. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर अमित ठाकरेंना न मिळाल्याने मनसेच्या मागण्यांचं निवेदन दिलं.
या बैठकीत अमित ठाकरे यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच महाव्यवस्थापकांपुढे वाचला. यावेळी मनसेचं शिष्टमंडळासह उपस्थित होतं.
अमित ठाकरे यांनी बैठकीत मुंबईकरांसबंधीत महत्वाचे मुद्दे मांडले. यात रेल्वेमध्ये एकही महिला सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून दिलं. तसेचं फक्त सुरक्षेसाठी सीसीटीव्हीच नाही तर सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी केली.
दर रविवारी मेगा ब्लॉक असतो, पावसाळ्यात सतत ट्रेनची राखडपट्टी होते यावर कायम तोडगा काढण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. तसेच रेल्वेच्या संख्येत वाढ व्हावी, कारण पहिल्या दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल तर त्या पासचा उपयोग काय आहे असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे दाखल होताचं मुख्यालयातील महाराजांच्या प्रतिमेला अमित राज ठाकरे यांनी हार अर्पण केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसेकडून देण्यात आलेलं निवेदन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement