एक्स्प्लोर

मिताली-अमित ठाकरे... निस्सीम प्रेमाची अनोखी गोष्ट

अमित अतिशय शांत आणि लाजऱ्या स्वभावाचे. काही वर्षांनंतर अमित यांनीच मितालीला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि बघता बघता 10 वर्ष उलटली.

मुंबई : दहा वर्ष जुनी मैत्री... त्यानंतर फुललेलं प्रेम आणि आता विवाहबंधन! हे लग्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एकुलत्या एक मुलाचं... म्हणजेच अमित ठाकरेंचं! त्यासाठी नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असलेलं 'कृष्णकुंज' रोषणाईने उजळून निघालंय. 27 जानेवारीला अमित ठाकरे मैत्रिण मिताली बोरुडेसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. कॉलेजमध्ये असतानाच अमित-मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे मुंबईच्या पोदार कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत होते, तर मिताली ही पोदार कॉलेजच्या शेजारील रुईया कॉलेजमध्ये कला शाखेची विद्यार्थिनी होती. काही ओळखीच्या मित्रांमुळे दोघांची कॉलेज कॅम्पसमध्येच ओळख झाली आणि ही मैत्री आणखी घट्ट झाली. अमित अतिशय शांत आणि लाजऱ्या स्वभावाचे. काही वर्षांनंतर अमित यांनीच मितालीला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि बघता बघता 10 वर्ष उलटली. मिताली ही मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडेंच्या कन्या बी. जी. सोमानी आणि वांद्र्यांच्या फॅशन इस्टिट्यूटमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं. राज यांची धाकटी कन्या उर्वशी ठाकरेंसोबत 'द रॅक' नावाचं बुटीक सुरु केलं. मिताली आणि उर्वशी सख्ख्या आणि पक्क्या मैत्रिणी असल्यामुळे मितालीचं कृष्णकुंजवर येणं जाणं सुरुच होतं. त्यामुळे सासरेबुवा राज ठाकरे आणि सासूबाई शर्मिला ठाकरेंना अमित-मितालीच्या नात्याची आधीच कुणकुण लागली होती. अमित आणि मितालीने आपल्या प्रेमाबद्दल घरात सांगितलं आणि दोन्ही कुटुंबांनी होकारही दिला. आयुष्याच्या खडतर प्रवासात खंबीरपणे साथ देणाराच तुमचा खरा साथीदार आणि भागीदार असतो. 2017 मध्ये अमित यांना दुर्धर आजारानं ग्रासलं. ठाकरे कुटुंब आणि मितालीसाठी मोठा धक्का होता. राज ठाकरेही अस्वस्थ होते, मात्र अमितला भक्कम साथ मिळाली ती मितालीची. आजारपणाच्या काळात मितालीने अमितची काळजी घेतली. अमितसोबतच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंना धीर दिला. अमित आजारपणातून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच दोघांचा साखरपुडा झाला. आता 27 जानेवारीला हे बंधन आणखी घट्ट होणार आहे. म्हणूनच हे लग्न... फक्त एका सेलिब्रिटीचं किंवा हायप्रोफाईल म्हणून महत्त्वाचं नाही. तर या दोघांच्या घट्ट नात्याला अधोरेखित करणारं... आणि निस्सिम प्रेमाची परिभाषा ठरवणारं आहे...

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget