एक्स्प्लोर

अंबरनाथच्या महिलेची ओमानच्या नरकयातनेतून सुटका

एकट्या बाईला इतकी कामं करणं अशक्यच होतं, मात्र तरीही काही दिवस फरीदानं हे निमूटपणे सहन करत काम केलं. मात्र कामात छोटीशीही चूक झाली तरी शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून छळ करणं असे प्रकार होऊ लागल्यानंतर फरीदा धास्तावली.

ठाणे : मोठ्या पगाराच्या आमिषानं हल्ली अनेकजण आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर काम करताना कशाप्रकारे अनन्वित छळ केला जातो, याचं उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलं आहे. परदेशात नोकरी करणं हे हल्ली भूषण मानलं जातं. मोठा पगार आणि परदेशात राहण्याचं आकर्षण याला भुलून अनेक जण परदेशात आणि त्यातही आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर कशाप्रकारे छळ केला जातो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अंबरनाथची फरीदा खान. अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणाऱ्या फरीदाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे परदेशात काही वर्ष काम करून परिस्थिती सुधारेल, या आशेनं तिनं एका एजंटच्या मदतीनं काही महिन्यांपूर्वी दुबई गाठलं. तिथून तिला ओमानमधील मस्कतला नेऊन अहमद कपिल नामक व्यक्तीच्या घरी घरकामाला ठेवण्यात आलं. मात्र 17 खोल्यांच्या अवाढव्य घराची साफसफाई, त्यातल्या 20-25 माणसांच्या जेवणापासून कपडे धुणं, भांडी घासणं, गाड्या धुणं अशी सगळी कामं तिच्या एकटीवर टाकण्यात आली. एकट्या बाईला इतकी कामं करणं अशक्यच होतं, मात्र तरीही काही दिवस फरीदानं हे निमूटपणे सहन करत काम केलं. मात्र कामात छोटीशीही चूक झाली तरी शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून छळ करणं असे प्रकार होऊ लागल्यानंतर फरीदा धास्तावली. या सगळ्या छळाला कंटाळून तिनं काम सोडून भारतात परतण्याची मागणी केल्यानंतर तर तिचं तिच्या घरच्यांशी बोलणंही बंद करण्यात आलं. त्यामुळं काळजीत पडलेल्या तिच्या घरच्यांनी इकडे राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र खात्याकडे मदतीची याचना केली. त्याची दखल घेत ओमानमधील भारतीय उच्चायुक्तांनी फरीदाची शोधाशोध सुरु केल्यावर तिच्या मालकानं घाबरुन तिची सुटका केली आणि एजंटच्या मदतीनं तिला भारतात माघारी धाडलं. या सगळ्यानंतर आता पैशांच्या हव्यासापोटी आखाती देशात कुणीही जाऊ नका, असं आवाहन फरीदा करतेय याप्रकरणी लोकांना फसवून आखाती देशात गुलाम म्हणून पाठवणाऱ्या स्थानिक एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची तिची मागणी आहे. शिवाय आखाती देशात अशाप्रकारे अनेक भारतीय लोकांना गुलाम म्हणून डांबून ठेवल्याचंही फरीदा सांगते.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Thackeray Brothers Protest : राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Devendra Fadnavis and Devendra Fadnavis: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
Embed widget