एक्स्प्लोर
अंबरनाथमध्ये बाईकच्या कव्हरमध्ये सहा फुटी धामण
सर्पमित्रांना बोलावून बाईकच्या कव्हरमध्ये लपून बसलेला सहा फूट लांबीचा धामण पकडण्यात आला.
कल्याण : बाईकच्या कव्हरमध्ये भलामोठा साप लपून बसल्याचा प्रकार कल्याणमधील अंबरनाथ भागात समोर आला आहे. सर्पमित्रांना बोलावून सहा फूट लांबीचा धामण पकडण्यात आला.
अंबरनाथच्या बारकू पाड्यातील पंचशील अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. इमारतीच्या बेसमेंटमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीच्या कव्हरमध्ये मोठा साप लपल्याचं रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केलं.
बाईकच्या कव्हरमधून तब्बल सहा फूट लांबीचा धामण जातीचा साप बाहेर आला आणि पळून जाऊ लागला. मात्र सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी साप यशस्वीपणे पकडला.
हा साप विषारी नसून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. मात्र या प्रकारामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या चालवणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement