एक्स्प्लोर

कॅन्सरग्रस्ताच्या नावे 10 लाख जमवले, जागरुक प्रवाशांमुळे टोळीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनमध्ये एखाद्या रुग्णाच्या नावाने पैसे गोळा करणारे अनेक जण दिसतात. मात्र पैसे गोळा करणारे बरेच जण बोगस असतात. कॅन्सरग्रस्तांच्या नावे पैसे घेऊन ते प्रवाशांची फसवणूक करत असतात. परंतु लोकलमधील सतर्क प्रवाशांनी नुकतंच पैसा गोळा करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला. महत्त्वाचं म्हणजे 3 वर्षांच्या मुलाला आर्थिक मदतीची गरज नसतानाही त्यांनी प्रवाशांकडून तब्बल 10 लाख रुपये गोळा केले होते.   टाटा मेमोरियलचं बनावट प्रमाणपत्र आणि लहान मुलाचा फोटो दाखवून दोघे जण लोकलमधील प्रवाशांची फसवणूक करायचे. 3 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचं ते प्रवाशांना सांगत आणि त्यांच्याकडून पैसे जमा करायचे. विशेष म्हणजे या मुलाला कोणत्याही मदतीची गरज नव्हती.   मुलाच्या उपचाराच्या नावे 10 लाख जमवले मात्र दोन सतर्क प्रवाशांनी मागील आठवड्यात या दोघांचं पितळ उघडं पाडलं. त्यांची तक्रार केल्यानंतर दोघांनी आणखी दहा सहकाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली. हे टोळकं टाटा मेमोरियलच्या बनावट प्रमाणपत्र आणि लहान मुलाच्या फोटोसह लोकल ट्रेनमधून प्रवास करायचं. फोटो दाखवून प्रवाशांकडून आर्थिक मदत मागायचे.   हरियाणातील उमीद फाऊंडेशचे कार्यकर्ते असल्याचा दावा 12 जणांच्या या टोळक्याने केला आहे. त्यांनी आतापर्यंत मुलाच्या उपचाराच्या नावावर तब्बल 10 लाख रुपये गोळा केले आहेत. मात्र यातील एक रुपयाही टाटा मेमोरियलच्या अकाऊंटमध्ये जमा झालेला नाही.  

कर्करोग्यांच्या नावे रेल्वेत पैसे गोळा करणारी टोळी अटकेत

  जागरुक प्रवाशांमुळे टोळीचा पर्दाफाश नितीन जाधव आणि जितेंद्र देशमुख या दोन सतर्क प्रवाशांनी या टोळक्याचा पर्दाफाश केला. हे दोघोही 12 ऑगस्ट रोजी लोकल ट्रेनने मानखुर्दहून सीएसटीला जात होते. त्यावेळी उमीद फाऊंडेशनचे कार्यकर्ते नितू भगत आणि प्रेमकुमार भगत कॅन्सरग्रस्त मुलासाठी देगणी गोळ करताना दिसले. टाटा मेमोरियलमध्ये या मुलावर उपचार सुरु असल्याचं ते सांगत होते. काही प्रवासी दोघांना पैसे देत असल्याचं पाहिल्यानंतर देशमुखांना संशय आला. लोकल ट्रेनमध्ये अशाप्रकारचं टोळकं कार्यरत असल्याचं बातम्यांमध्ये वाचलं होतं. मीही आधी या लोकांना पैसे द्यायचो. मात्र बातमी वाचल्यानंतर त्यांना पैसे देणं बंद केलं. तसंच हे पैसे खरोखरच रुग्णांपर्यंत पोहोचतात का, असाही विचार डोक्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.   उमीद फाऊंडेशनचे कार्यकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या दोघांना देशमुख आणि जाधव यांनी काही प्रश्न विचारले. मात्र त्यांची भंबेरी उडाली. टाटा मेमोरियलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोघांनी ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केलं. मात्र देशमुख आणि जाधव यांनी दोघांनाही पकडलं. तसंच त्यांना रुग्णालयात घेऊ गेले.   दुसऱ्याच संस्थेकडून सफ्रुद्दीनवर उपचार उमीद फाऊंडेशनने तीन वर्षांच्या सफ्रुद्दीनच्या अकाऊंटमध्ये एक रुपयाही ट्रान्सफर न केल्याचं समोर आलं. तसंच नितू आणि प्रेमकुमार यांच्याकडील प्रमाणपत्रही बनावट असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर सफ्रुद्दीनचा उपचार दुसरी एक संस्था करत असून त्याच्या कुटुंबीयांना आता आर्थिक मदतीची गरज नाही. सफ्रुद्दीनच्या वडिलांनी सांगितलं की, "टाटा मेमोरियलमध्ये मुलाला घेऊन आल्यानंतर उमीद फाऊंडेशनचे कार्यकर्ते मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भेटले होते. यानंतर मुलाच्या उपचारासाठी पैसा जमा करण्याचं आश्वासन देत त्यांनी मुलाच्या अडमिशन पेपरची कॉपी घेतली. पण माझ्या मुलाचा आजार हा एखाद्याचा पैसे कमावण्याचा मार्ग ठरु शकतो, याची कल्पनाच केली नव्हती."   याआधीही पैसे उकळण्याच्या अनेक घटना दरम्यान, लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या फसवणुकीची ही पहिलीच घटना नाही. गरीब मुलांच्या शाळेसाठी, रुग्णालयासाठी तसंच काही संस्थांच्या नावावर काही महिला आणि पुरुष मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांकडून देणगी मागतात. याच वर्षी मध्य आणि हार्बर मार्गावरील ट्रेनमध्ये 25 हून अधिक अशा घटनांची नोंद झाली आहे. तर पश्चिम मार्गावरील लोकलमध्ये या घटनांची संख्या 15 आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget