मुंबई: जनतेचा रोष सोडा, इथे आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, समाधानी कोणीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. राजीनामा दिलेले भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांची मुंबईत आल्यावर भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला? राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य, पार्थ निवडणूक लढणार का? अशा विविध मुद्द्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं.
आशिष देशमुखांची भेट घेणार
भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला. त्याबाबत अजित पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्षातले आमदार राजीनामे देत आहेत. मग जनतेत किती रोष असेल हे दिसून येतं. आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतक-यांवर हल्ला होत आहे. इथे समाधानी कोणीच नाही. भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आशिष देशमुखांची मुंबईत आल्यावर भेट घेणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
‘शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास’
“राफेल व्यवहारप्रकरणी शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कालच्या सभेत पवारांनी थेट भाष्य केलं. राफेल डील प्रकरणावर पवारांनी थेट सवाल उपस्थित केले आहेत”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
गैरसमजातून अन्वरांचा राजीनामा
खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजातून राजीनामा दिला आहे, पवारांशी त्याचे थेट आणि घरोब्याचे संबंध आहेत, असं अजित पवार म्हणाले.
पार्थ पवार राजकारणात येणार का?
आताची पीढी मोठी झाली आहे, आपला निर्णय स्वत: घेत असतात, काम करताना स्थानिक कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेतलं जातं. मी मागे बोललो होतो, माझ्या मुलांनी राजकाराणात येऊ नये, पण आता जग बदलत चाललं आहे. तरुण पीढ़ी स्वत:चे निर्णय स्वत: घेत असतात, आपण कोणावर निर्णय लादू नये. जर कोणी निर्णय घेत असेल, तर आपण त्यांना रोखूही शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या
भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा
मुलगा पार्थ लोकसभा निवडणूक लढणार का? अजित पवार म्हणतात...
आशिष देशमुखांची मुंबईत भेट घेणार: अजित पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2018 03:55 PM (IST)
आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला? राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य कसं वाटलं? पार्थ निवडणूक लढणार का? अशा विविध मुद्द्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -