मुंबई : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आता अनेक कलाकार पुढे येऊ लागले आहेत. एकिकडे सलमान खान, अक्षयकुमार, सुनील शेट्टी, सोनू सूद अशी मंडळी आपल्या परिने मदत करत असतानाच अजय देवगणही कुठेही गाजावाजा न करता कोविडसाठी मदत करत आहे. अभिनेता अजय देवगण आता मुंबईमध्ये दोन कोविड रुग्णालये उभारणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने शिवाजी पार्क परिसरातल्या मैदानावर 20 बेड्सच्या कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. 


अजय देवगणने आता आणखी दोन योजना अमलात आणायच्या ठरवल्या आहेत. दादरमध्ये मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आता आणखी दोन कोविड रुग्णालये तयार करण्यासाठी अजय देवगण पुढाकार घेणार असल्याचं कळतं. काही बेड्स यात तयार केले जाणार असून एक जुहूला आणि दुसरं बोरिवलीत तयार करण्याच्या विचारावर देवगण टीम ठाम आहे. या दोन्ही ठिकाणी 25 -25 असे बेड्स तयार केले जाणार आहेत. विशेष बाब अशी की अजय देवगणच्या या कामात अमिताभ बच्चनही काही मदत करणार असल्याचं कळतं. अर्थात त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दिग्दर्शक आनंद पंडित यांनी माध्यमांना दिलेल्या माहीतीमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात हे बेड्स तयार होतील. 


अजय देवगणने नेहमीच मुंबईला कोविड काळात मदत केली आहे. पहिल्या लाटेतही अजय देवगणने धारावीमध्ये कोव्हिड बेड्सची उभारणी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्याने शिवाजी पार्क परिसरातल्या मैदानावर 20 बेड्सच्या कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. त्यामध्ये 15 आयसीयू बेड्स आणि 5 व्हेन्टिलेटर्स बेड्सची सुविधा आहे. मुंबईतील हिंदूजा रुग्णालयाकडून हे सेंटर चालवण्यात येत आहे. कोविडचा संसर्ग पाहता आता पुन्हा एकदा ही मोहीम हाती घेण्याचं त्यांनी ठरवलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :