एक्स्प्लोर
सोसायटीच्या आवारातून वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबवली!
चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मुंबई : मालाडमधील एका सोसायटीत चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सोसायटीमधील घरात जाताना एका वृद्ध महिला लिफ्टच्या जवळ गेली असता चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला.
आजपर्यंत सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार रस्त्यांवर घडत होते. मात्र या प्रकारामुळे सोसायट्यांच्या आवारातही महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस सध्या सोनसाखळी चोराचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
बीड
राजकारण
Advertisement