एक्स्प्लोर
आदित्य ठाकरेंच्या मोर्चाची सोशल मीडियावर खिल्ली, व्यंगचित्र व्हायरल
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या शिक्षण विभागाविरोधातील मोर्चाची आता खिल्ली उडवली जात आहे. या मोर्चाचे विविध व्यंगचित्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
शिक्षण विभागातल्या कारभाराविरोधात युवासेनेने केजी टू पीजी मोर्चा काढला होता. गिरगाव चौपाटी ते इस्लाम जिमखानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
त्यानंतर इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर आदित्य ठाकरेंनी भाषणात सरकार आणि शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढले होते.
मात्र, आता या मोर्चाची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली आहे. हे व्यंगचित्र नेमके कुणी व्हायरल केले आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शिवाय, युवासेना किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
बीड
Advertisement