एक्स्प्लोर

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीने गुन्हा कबुल केला, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

साकीनाका बलात्कार प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषद घेत, आरोपीने गुन्हा कबुल केल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 

आरोपीला सध्या 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा कसा झाला याचा घटनाक्रम पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. येत्या महिनाभरात किंवा त्याआधी संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, असंही पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगच्या सदस्या चांद्रमुखी आणि अरुण हलदर यांनी सुद्धा भेट दिली आणि चर्चा केली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केला आहे. तसेच आज 1.30 वाजता मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांची सह्याद्री येथे बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. 

राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती
 
मुख्यमंत्री यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विशेष सरकारी अभियोक्ता यांची खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रसिद्ध वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली, यावर आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी समाधान व्यक्त केले.   

काय आहे प्रकरण? 

मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचं समोर आलं होतं. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.  या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.

संबंधित बातम्या

संतापाची लाट उसळली! संतप्त प्रतिक्रिया, पीडितेच्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष आक्रमक, आरोपीला फाशी देण्याची मागणी

Mumbai Rape Case :  साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईच्या मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली, पोलीस घटनास्खळी दाखल
मुंबईच्या मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली, पोलीस घटनास्खळी दाखल

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Virat Kohli and Rohit Sharma  विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Embed widget